crime news esakal
महाराष्ट्र बातम्या

Crime News : ग्रामस्थांची सतर्कता! पत्नीच्या खुनातला आरोपी वेषांतर करुन गावात आला अन्...

सकाळ वृत्तसेवा

तिसंगी : पत्नीचा खून करुन आरोपी खुनाची शिक्षा भोगत होता. मागे कोरोना काळात त्याने रुग्णालयातून पलायन केलं अन् विषांतर करुन फिरु लागला. तो जेव्हा गावात आला तेव्हा ग्रामस्थांना मोठ्या शिताफीने त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं.

तिसंगी (ता. पंढरपूर) येथील शिवाजी नाथाजी भोसले हा पत्नीच्या खुनाच्या अरोपाखाली शिक्षा भोगत होता. कोरोना काळात २०२०मध्ये आजारी असताना त्याला उपजिल्हा रुग्णालय दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्याने शौचाला जाण्याचा बहाणा केला अन् शौचालयाची खिडकी तोडून पळून गेला.

त्यानंतर शिवाजी नाथाजी भोसले हा दोन वर्षांपासून वेषांतर करुन फिरत होता. दि. 18 आक्टोंबर, बुधवारी सायंकाळी 7 वाजता त्याने बुवाचा वेष धारण करुन तिसंगी गावात प्रवेश केला. गावात संशयितरित्या फिरत असताना गावातील लोकांना तो दिसला.

तो खुनाच्या गुन्ह्यातला आरोपी असल्याचा लोकांना संशय आला. त्यानंतर तिसंगी गावातील लोकांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं. दोन वर्षांपूर्वी पोलिसांना चकवा देवून पळालेला आरोपी शिवाजी नाथाजी भोसले, हा तोच असल्याचं नंतर सिद्ध झालं.

या प्रकरणामध्ये आरोपी फरार झाल्यामुळे पोलिसांचं निलंबनदेखील झालं होतं. तिसंगी गावाने केलेल्या कामगिरीबद्दल पंढरपूर पोलिस स्टेशनचे अधिकारी पीएसआय प्रशांत भागवत यांनी गावकऱ्यांचे अभिनंदन केले. आरोपीस आज सेशन कोर्ट व प्रथम वर्ग न्यायालय हजर करण्यात आले. पुढील तपास पीएसआय भागवत हे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT