politics esakal
महाराष्ट्र बातम्या

'हिंदू समाज या बांडगुळांना अन् शकूनी मामाच्या फौजेला उत्तर देईल'

पवित्र हिंदू धर्माच्या परंपरेची आणि संस्कृतीची खिल्ली उडवण्यात आली आहे.

सकाळ डिजिटल टीम

पवित्र हिंदू धर्माच्या परंपरेची आणि संस्कृतीची खिल्ली उडवण्यात आली आहे.

राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी केलेल्या एका विधानावरुन ब्राह्मण महासंघानं पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केलं आहे. यावेळी महासंघाचे नेते आनंद दवे हे आक्रमक झाले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला इशारा देताना आज आम्ही कार्यालयात घुसलो आहोत, उद्या घराघरात घुसू असा इशाराही दिला आहे. आमदार मिटकरी यांच्या या वक्तव्यावरून सध्या टीकेचे धनी झाले आहे. दरम्यान, आता आचार्य तुषार भोसले यांनी तीन मंत्र्यांवरी टीकास्त्र सोडले आहे.

यासंदर्भात आचार्य भोसले यांनी एक ट्विट केलं आहे. त्यांनी मंत्री जयंत पाटील, मंत्री धनंजय मुंडे आणि अमोल मिटकरी यांच्यावर अप्रत्यक्षरित्या टीका केली आहे. यात ते म्हणतात, नुकताच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये पवित्र हिंदू धर्माच्या परंपरेची आणि संस्कृतीची खिल्ली उडवण्यात आली आहे. हिंदू धर्माची चेष्टा करणारा हा दुसरा तिसरा कोणी नसून राज्याच्या राजकारणातील शकुनी मामाचा सरदार अमोल किटकरी आहे. आणि त्यावर निर्लज्जपणे दात काढणारे मंत्री जयंत पाटील आणि तीन-चार बायका सोडणारे मंत्री धनंजय मुंडे आहेत. पावसाळी सुरु होण्याआधी या बांडगुळांनी तोंड वर काढंल आहे. परंतु हिंदू समाज यांना आणि शकुनी मामाच्या फौजेला योग्य उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही, असा त्यांनी इशारा दिला आहे.

दरम्यान, या आंदोलनाविरोधात स्पष्टीकरण देताना अमोल मिटकरी म्हणाले, माझं भाषण जर पूर्ण ऐकलं असेल तर त्यामध्ये कुठल्याही समाजाचा उल्लेख केलेला नाही. मी कोणाबद्दलही अपशब्द बोललेलो नाही. मी तिथं एका गावातील कन्यादानाच्या प्रसंगाचं उदाहरण देऊन मंत्रोच्चाराचा उल्लेख केला. यामध्ये कोणालाही त्रास होण्याचं कारण नाही. त्यामुळं भाषणाचा विपर्यास करुन वेगळ्या पद्धतीनं वळण देण्याचं कटकारस्थानं केलं जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Kisan Yojana: खुशखबर! 'या' महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात येणार २००० रुपये; किसान योजनेबाबत मोठी अपडेट समोर

Nitesh Rane, Disha Salian case : आदित्य ठाकरे दिशा सालियान प्रकरणावर नितेश राणे तोंड सांभाळणार, थेट सांगून टाकलं 'धन्यवाद'...

Pathardi Bribery Case : पाथर्डीत अडीच लाखांची लाच घेताना पोलिस अटकेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

Kolhapur Rain Alert : घाट माथ्यासह कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचं कमबॅक! पुढील चार दिवस 'या' मुदतीत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज, 'यलो अलर्ट' जारी

Marathi News Live Updates : तामिळनाडूतील तंजावर येथे २३ रोजी होणार दक्षिण भारतातील पहिलेच मराठी साहित्य संमेलन

SCROLL FOR NEXT