महाराष्ट्र बातम्या

शंखनाद अखेर मुख्यमंत्र्यांच्या कानी घुमला - आचार्य भोसले

सकाळ डिजिटल टीम

क्रम चुकला आधी मदिरा आणि नंतर मंदिर पण आम्ही त्यांना वठणीवर आणलं असेही आचार्य तुषार भोसले म्हणाले आहेत.

कोरोनामुळे बंद करण्यात आलेली धार्मिक स्थळे घटस्थापनेच्या मुहुर्तावर उघडण्यासाठी राज्य सरकारने परवानगी दिली आहे. लॉकडाऊन हटवण्यात आल्यानंतर कोरोना संसर्गाची परिस्थिती नियंत्रणात असल्यानं हा निर्णय़ घेतला आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशीपासून म्हणजेच ७ ऑक्टोबरला सर्व धर्मियांची प्रार्थना स्थळे सोशल डिस्टन्सिंगसह नियम पाळून भक्तांसाठी उघडण्याचा निर्णय़ शुक्रवारी घेतला गेला. ठाकरे सरकारला उशिरा का होईना शहाणपण सुचलं असं म्हणत आचार्य तुषार भोसले यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर टीका केली. तसंच ठाकरे सरकारच्या निर्णय़ाचे स्वागतही केले.

राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी शंखनाद आंदोलनही कऱण्यात आले होते. त्यालाच यश मिळाल्याचं आचार्य तुषार भोसलेंनी म्हटलं आहे. महाराष्ट्राच्या भाविक-भक्तांचा शंखनाद अखेर मुख्यमंत्र्यांच्या कानी घुमला.अनेक महिन्यांपासून सुरु असलेल्या आमच्या लढ्याला अखेर यश आलं. ठाकरे सरकारला उशीरा सुचलेलं हे शहाणपण आहे पण आम्ही घटस्थापनेची आता आतुरतेने वाट पहातो आहोत कारण दीर्घकाळानंतर आमच्या आराध्याचं दर्शन होईल असं आचार्य तुषार भोसलेंनी फेसबुकवर म्हटलं.

घटस्थापनेला आमच्या आदिशक्तीचं दर्शन घेता येणार आहे ही आमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. उशिरा का होईना ठाकरे सरकारला सुचलेलं हे शहाणपण आहे. क्रम चुकला आधी मदिरा आणि नंतर मंदिर पण आम्ही त्यांना वठणीवर आणलं असेही आचार्य तुषार भोसले म्हणाले आहेत.

तसंच ठाकरे सरकारच्या निर्णयाचं स्वागतही त्यांनी केलं. ते म्हणाले की, ठाकरे सरकारचा निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. आता ७ तारखेची, घटस्थापनेची आतुरतेने वाट पाहतोय. यादिवशी आम्हाला आमच्या आराध्य दैवताचं दर्शन घेता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koregaon Society Election 2026 : कोरेगाव मतदारसंघात पुन्हा ईश्वर चिठ्ठीचा योगायोग; पाच वर्षांनंतर इतिहासाची पुनरावृत्ती! 2021 मध्ये खत्री चिठ्ठीवर विजयी, तर 2026 मध्ये मानेंना नशिबाची साथ

Shambhuraj Desai Satara Bank Election Victory : सातारा जिल्हा बँकेत घडला इतिहास! स्व. शिवाजीराव देसाईंनंतर 45 वर्षांनी देसाई घराण्याची दमदार एन्ट्री; पालकमंत्र्यांचा उर आला भरुन

IND vs NZ, ODI: रोहित शर्मा न्यूझीलंडमध्ये घडवणार इतिहास? विश्वविक्रमांसह ७ मोठे पराक्रम करण्याची संधी

Latest Marathi News Live Update : लडाख प्रशासनाने सोनम वांगचुक यांच्या एचआयएएलला बजावली नोटीस

Mhada House: फक्त २० लाखांत म्हाडा देणार १,४०० घरे, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत कोकण मंडळाचा पुढाकार

SCROLL FOR NEXT