steet dogs mumbai sakal
महाराष्ट्र बातम्या

भटक्या श्‍वानांना ठार मारण्यासाठी अनोळखी व्‍यक्तीने फेकले ॲसिड; ३ ठार १९ गंभीर

Chinmay Jagtap

Navi Mumbai: रण तालुक्यातील वेश्‍वी गावात भटक्या श्‍वानांना ठार मारण्यासाठी अनोळखी व्‍यक्तीने ॲसिड फेकल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. यात तीन श्वानांचा मृत्यू; तर १९ श्वान गंभीर जखमी झाले आहेत.

१२ कुत्र्यांवर पनवेलमधील हँड्स दॅट हेल ॲनिमल केअर फाऊंडेशनच्या शेल्टरमध्ये उपचार सुरू आहेत. याप्रकरणी उरण पोलिसांनी महिनाभरानंतर अनोळखी व्‍यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे.

वेश्‍वी गावातील सुनील मढवी व त्यांची पत्नी रश्‍मिता मढवी हे दोघे श्‍वानप्रेमी आहेत. त्यांनी आपल्या घराच्या टेरेसवर श्‍वानांसाठी शेल्टर होम तयार केले आहे. तेथे जखमी किंवा आजारी श्‍वानांवर ते उपचार करतात. २१ नोव्हेंबरला मढवी दाम्पत्याने त्यांच्या घराजवळ श्‍वानांना खाद्यपदार्थ खाण्यास दिले होते.

तेव्‍हा सर्व श्‍वान हे चांगल्या स्थितीत होते. दुसऱ्या दिवशी काही श्‍वानांच्या चेहऱ्यावर जळाल्याच्या जखमा दिसून आल्या. त्यानंतर मढवी दाम्पत्याने इतर श्‍वानांची पाहणी केली असता बऱ्याच कुत्र्यांच्या अंगावर तशाच जखमा आढळल्या. मढवी यांनी पनवेलमधील हँड्स दॅट हेल ॲनिमल केअर फाऊंडेशनच्या संस्थापिका अनामिका चौधरी यांच्या माध्यमातून १२ जखमी श्वानांना तात्काळ कल्हे गावातील त्यांच्या शेल्टरमध्ये दाखल केले. तसेच तीन मृत श्‍वानांवर त्यांनी अंत्यसंस्कार केले.

उर्वरित पाच श्‍वान त्यांना सापडलेले नाहीत. याप्रकरणी मढवी दाम्पत्याने उरण पोलिस ठाण्यात केलेल्या तक्रारीवरून महिनाभरानंतर प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिस परिसरातील सीसी टीव्ही फुटेजची तपासणी करून अनोळखी आरोपीची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, या प्रकाराबाबत प्राणिमित्र संघटनांनी गंभीर चिंता व्‍यक्त केली आहे.

महापालिकेने भटक्या श्‍वानांचा बंदोबस्त करावा. त्यासाठी निर्बिजीकरण, लसीकरणासारख्या उपाययोजना कराव्यात, त्यासाठी नागरिकांनी दबाव आणावा. कुत्र्यांना ठार मारणे, त्यांच्यावर ॲसिडहल्ला करणे यांसारखी अमानुष कृत्ये करू नयेत. हल्ला करणाऱ्या व्यक्तीला ॲसिड कसे आणि कुठून मिळाले, याचा पोलिसांनी शोध घेणे आवश्यक आहे. असे प्रकार पुन्हा होऊ नयेत यासाठी अशा आरोपींना कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे.

- अनामिका चौधरी, संस्थापिका, हँड्‌स दॅट हेल ॲनिमल केअर फाऊंडेशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Drug Racket : पुण्यात एमडी ड्रग्ज विक्रीसाठी डिलिव्हरी अ‍ॅपचा वापर; मोठे रॅकेट उघड, चार जण अटकेत

Satara Politics: सातारा झेडपीची अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड रद्द करा;राष्ट्रवादीचे विभागीय आयुक्तांकडे अपील, जिल्हाधिकारी, एसपींबाबत तक्रार!

Yo Yo Honey Singh Pune show : यो यो हनी सिंगचा पुण्यातला शो होणार रद्द, थेट एसपींकडे तक्रार; गाण्यावर घेत आक्षेप

What is Anjaneri Ropeway Project? हनुमान भक्तांसाठी मोठी बातमी! सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी अंजनेरीला मिळणार नवं रूप; आता डोंगरावर चढण्याची कसरत संपणार!

NCP MLAs leaving party : राष्ट्रवादी काँग्रेसचे २५ ते ३० आमदार पक्ष सोडणार?, हसन मुश्रीफांनी एका वाक्यात कंडका पांडला

SCROLL FOR NEXT