adar ponnawala esakal
महाराष्ट्र बातम्या

अदर पुनावालांची सुरक्षा वाढवली, धमक्या देणाऱ्यांवर कारवाई

गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांची पत्रकारांना माहिती

अशोक निंबाळकर

नगर ः कोरोना लस निर्मिती करणाऱ्या सिरम इन्सिट्युट ऑफ इंडिया कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. कोणी धमक्‍या दिल्यास त्यांनी पोलिस विभागाकडे तक्रार करावी. राज्य पोलिस निश्‍चितच गांभीर्यांने या प्रकरणाचा तपास करून आरोपींवर कारवाई करतील, अशी ग्वाही गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराजे देसाई यांनी दिली.

गृह राज्यमंत्री देसाई यांनी कोरोना साथीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा पोलिस दलाचा आढावा घेतला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अतिरिक्‍त अधीक्षक सौरभ अग्रवाल, दीपाली काळे आदी उपविभागीय अधिकारी, पोलिस निरीक्षक उपस्थित होते.

देसाई म्हणाले की, कोरोना प्रतिबंधक लस तयार करणाऱ्या सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांच्या सुरक्षितेसाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. त्यांना सध्या वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. त्यांना कोणी धमक्‍या दिल्या असल्यास त्यांनी पोलिसांकडे तक्रार करणे आवश्‍यक आहे.

राज्याचे पोलिस या प्रकरणाचा मुळापर्यंत जाऊन निश्‍चित तपास करतील. या प्रकरणावर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे काय म्हणाले आहेत. हे आपल्या माहिती नाही. गेल्या तीन-चार दिवसांपासून आपण कोरोना परिस्थितीवर पोलिस दलाचा आढावा घेत आहोत.

या कालावधीत वृत्तपत्र किंवा इतर माध्यमातून ही बाब आपल्या कामाच्या व्यापामुळे निदर्शनास आली नाही. त्यांच्या सुरक्षेला प्राधान्य राहणार असल्याचे देसाई यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG : इंग्लंडने अचानक संघ बदलला; भारतीय गोलंदाजांची कामगिरी पाहून यजमानांना 'तो' आठवला

Solapur Water Crisis: उजनी धरणात ५१ टक्के साठा; उसासह पिके जळू लागल्याने उजव्या-डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी

Live News Update Marathi: ठाण्यातील धोकादायक वृक्षांची वैज्ञानिक तपासणी करण्याची मागणी

IND VS ENG 1ST ODI: जबरदस्त कॅच! लोकेश राहुलची 'झेप' पाहून इंग्लंडचा संघ अवाक्... भारतीय संघाची मजबूत पकड, Video Viral

Pune Cyber Scam: वीज मीटर नाव बदलण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांकडून महिलेची साडेसात लाखांची लूट

SCROLL FOR NEXT