महाराष्ट्र बातम्या

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवर कारवाई व्हावी; भाजपचं राज्यपालांना साकडं

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कारवाईसाठी भाजप शिष्टमंडळाने राज्यपालांना पत्र लिहलंय. नाना पटोले यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी भाजपने केली आहे. पोलिसांना एफआयआर दाखल करून घेण्याच्या सूचना द्यावा, अशी मागणी भाजपच्या शिष्टमंडळाची पत्राद्वारे राज्यपालांकडे केली आहे.

नाना पटोले काय म्हणाले होते?

जिल्ह्यात रविवारी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक (Zilla Parishad and Panchayat Samiti elections) प्रचार करण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या मतदार संघात निसटता पाय मजबूत करण्यासाठी विविध ठिकाणी सभा घेतल्या. सायंकाळी घेण्यात आलेल्या प्रचार सभेत नाना पटोले (Nana Patole) यांनी ‘मी मोदीला (Narendra Modi) मारू शकतो व शिव्याही देऊ शकतो’ असे दादागिरी करणारे वक्तव्य केले होतं. त्यावर भाजपने आक्षेप घेतल्यानंतर नाना पटोलेंनी स्पष्टीकरण देत म्हटलं होतं की, ‘मी आमच्या एका गाव गुंडाबद्दल बोलत होते, त्याच नाव मोदी आहे.

या सगळ्या प्रकरणावर भाजप आक्रमक झाला असून त्यांनी आता राज्यपालांना पत्र लिहून कारवाईची मागणी केली आहे. त्यांनी या पत्रात म्हटलंय की, नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत बेताल वक्तव्य केलं असून भाजप पक्ष त्याचा निषेध करत आहे. देशाच्या पंतप्रधानांबाबत काँग्रेसच्या मनात इतका द्वेष आहे की आता ते त्यांना मारण्याचीही भाषा करत आहेत, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई व्हावी. त्यांचं हे वक्तव्य अत्यंत गंभीर आणि आक्षेपार्ह आहे. त्यामुळे पोलिसांना एफआयआर दाखल करून घेण्याच्या सूचना द्यावा, अशी मागणी भाजपच्या शिष्टमंडळाची पत्राद्वारे राज्यपालांकडे केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Registrar Dairy Department Transferred : रात्रीतून सुत्रे फिरली गोकुळच्या राजकारणाला नवे वळण, थेट दुग्ध विभागाच्या निबंधकांची उचलबांगडी; सभासद नोंदणी वाद भोवला

Vidhan Parishad Election: विधान परिषदेसाठी भाजपमध्ये 'ही' नावे चर्चेत, आमदारकीसाठी 'फिल्डिंग' लावायला सुरुवात, कुणाला मिळणार संधी?

India Petrochemical Duty Exemption : सरकारचा मोठा निर्णय ! ४० प्रमुख पेट्रोकेमिकल्सवरील आयात शुल्कात सूट,'या' उद्योगांना दिलासा

Latest Marathi News Live Update : रांजणगावमध्ये तरुणावर लाकडी बॅटने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Vidarbha News: भरधाव दुचाकीच्या अपघातात तरुण जागीच ठार; जाम महामार्गावर नियंत्रण सुटल्यामुळे दुचाकीने वाहनाला धडक

SCROLL FOR NEXT