sugarcane FRP 
महाराष्ट्र बातम्या

उसाची 2,266 कोटी एफआरपी थकीत ! 17 कारखान्यांवर कारवाई; आतापर्यंत 17,869 कोटी ऊस उत्पादकांना प्राप्त

प्रदीप बोरावके

माळीनगर (सोलापूर) : चालू गळीत हंगामात 31 मार्चअखेर राज्यात गाळप झालेल्या उसाची 2,266.49 कोटी रुपये एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना कारखान्यांकडून देणे बाकी आहे. यंदाच्या हंगामात राज्यातील ऊस उत्पादकांना 17,869.75 कोटी रुपये (88.74 टक्के) उस बिलाच्या रूपाने मिळाले आहेत. दरम्यान, थकीत एफआरपी प्रकरणी साखर आयुक्तांकडून 17 कारखान्यांवर आतापर्यंत कारवाई करण्यात आली आहे. मार्चच्या दुसऱ्या पंधरवड्यात 2,019.13 कोटी रुपयांची ऊस बिले शेतकऱ्यांना मिळाली आहेत. 

साखर आयुक्तालयाकडून याबाबतची आकडेवारी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. राज्यात यंदा 188 कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला आहे. त्यामध्ये 31 मार्चअखेर 908.49 लाख टन उसाचे गाळप झाले आहे. या उसाची एकूण देय असलेली एफआरपीची रक्कम 20,122.32 कोटी रुपये आहे. त्यापैकी 17,869.75 कोटी रुपये एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना देण्यात आली आहे. त्यामध्ये 13.49 कोटी रुपये एफआरपीची जादा रक्कम देण्यात आली आहे. ती वजा जाता 17855.83 कोटी रुपये निव्वळ एफआरपी शेतकऱ्यांना मिळाली आहे. एकूण एफआरपीच्या 88.74 टक्के रक्कम शेतकऱ्यांना कारखान्यांकडून अदा करण्यात आली आहे. 87 कारखान्यांनी 100 टक्के एफआरपी दिली आहे. 101 कारखान्यांकडे एफआरपीची थकबाकी आहे. 42 कारखान्यांनी 100 टक्केपर्यंत, 27 कारखान्यांनी 80 टक्केपर्यंत तर 33 कारखान्यांनी 60 टक्केपर्यंत एफआरपी दिली आहे. 

दरम्यान, मागील सर्व हंगामातील मिळून 321.46 कोटी रुपये एफआरपीची थकबाकी अद्यापही कारखान्यांकडे आहे. यंदा थकीत एफआरपी संदर्भात 17 कारखान्यांवर आरआरसी अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. 

2019-20 च्या हंगामात 31 मार्च 2020 अखेर राज्यात 142 कारखान्यांनी हंगाम घेतला होता. या कालावधीत 505.47 लाख टन उसाचे गाळप झाले होते. या उसाची एकूण देय असलेली एफआरपीची रक्कम 11,633.08 कोटी रुपये होती. त्यापैकी 10,440.36 कोटी रुपये एफआरपी शेतकऱ्यांना देण्यात आली होती. 1,207.97 कोटी रुपये एफआरपीची थकबाकी होती. 

कारवाई झालेले कारखाने 
श्री विठ्ठल सहकारी कारखाना, वेणूनगर (ता. पंढरपूर), गोकूळ माऊली शुगर, तडवळ (ता. अक्कलकोट), सिद्धनाथ शुगर, तिऱ्हे (ता. उत्तर सोलापूर), विठ्ठल रिफाइंड शुगर, पांडे (ता. करमाळा), जयहिंद शुगर्स, आचेगाव (ता. दक्षिण सोलापूर), लोकमंगल ऍग्रो, बिबीदारफळ (ता. उत्तर सोलापूर), लोकमंगल शुगर इथेनॉल, भंडारकवठे (ता. दक्षिण सोलापूर), कंचेश्वर शुगर्स, मंगरूळ (ता. तुळजापूर), लोकमंगल माऊली शुगर, लोहारा (ता. उस्मानाबाद), शरद सहकारी कारखाना, विवामांडवा (ता. पैठण), वैद्यनाथ सहकारी कारखाना, पांगरी (ता. परळी), एसजीझेड अँड एसजीए, तुरची युनिट-1 (ता. तासगाव), युनिट-2, नागेवाडी (ता. खानापूर), श्री. संत दामाजी सहकारी, मंगळवेढा, किसन वीर-खंडाळा सहकारी, म्हावशी (ता. खंडाळा), जयभवानी सहकारी, शिवाजीनगर (ता. गेवराई), भीमा सहकारी, टाकळी सिकंदर (ता. मोहोळ) या कारखान्यांवर कारवाई झाली आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT