Trekking sakal
महाराष्ट्र बातम्या

Adventure tourism : विनानोंदणी साहसी पर्यटन उपक्रम राबविल्यास कारवाई होणार

राज्यातील सुरक्षित साहसी पर्यटनासाठी सुनियोजित व्यवस्था निर्माण करण्याच्या अनुषंगाने ‘साहसी पर्यटन उपक्रम धोरण’ राबवण्यात येत आहे.

सकाळ वृत्तसेवा

राज्यातील सुरक्षित साहसी पर्यटनासाठी सुनियोजित व्यवस्था निर्माण करण्याच्या अनुषंगाने ‘साहसी पर्यटन उपक्रम धोरण’ राबवण्यात येत आहे.

पुणे - राज्यातील सुरक्षित साहसी पर्यटनासाठी सुनियोजित व्यवस्था निर्माण करण्याच्या अनुषंगाने ‘साहसी पर्यटन उपक्रम धोरण’ राबवण्यात येत आहे. साहसी पर्यटन उपक्रम राबविणाऱ्या व्यक्ती, संस्था, सेवादाते कॅम्पस, रिसॉर्ट॒सना पर्यटन संचालनालयाकडे नोंदणी बंधनकारक आहे. विनानोंदणी साहसी उपक्रम चालवत असल्याचे निदर्शनास आल्यास कारवाई करण्यात येणार आहे.

जिल्ह्यात काही साहसी पर्यटन केंद्रचालक झिपलाईन, ट्रेकिंग, वॉटर स्पोर्ट असे उपक्रम विनानोंदणी राबवत असल्याचे निदर्शनास आले आहे. राज्यात पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाचा २४ ऑगस्ट २०२१ रोजीच्या शासन निर्णयानुसार ‘साहसी पर्यटन उपक्रम धोरण’ लागू करण्यात आले आहे. त्यानुसार साहसी पर्यटन उपक्रम राबविणाऱ्या संस्थांनी तत्काळ नोंदणी करावी. यापुढे विनानोंदणी साहसी उपक्रम चालवत असलेले निदर्शनास आल्यास नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती विभागीय पर्यटन कार्यालयाच्या सहायक संचालक सुप्रिया करमरकर- दातार यांनी दिली.

साहसी उपक्रम राबविणाऱ्या आयोजकांनी https://www.maharashtratourism.gov.in/ या पर्यटन संचालनालयाच्या संकेतस्थळावर ५०० रुपयांचे चलन https://gras.mahakosh.gov.in/echallan या लिंक वर भरून नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी विभागीय पर्यटन कार्यालय, एमटीडीसी कार्यालयाशेजारी, ‘आय बराक मध्यवर्ती बिल्डिंग, ससून रुग्णालया शेजारी, पुणे (मोबाईल क्रमांक ८०८००३५१३४) येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke MPSC : धर्म-जातीच्या नावावर मत मागता, पण शिक्षणाचं काय?’; पुण्यातील एमपीएससी आंदोलनात अभिजीत दिपकेंचा सवाल

GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

SCROLL FOR NEXT