thak.jpg
thak.jpg 
महाराष्ट्र

'ती'च्या हाकेला उद्धव ठाकरे यांनी दिली साद

रुपेश कदम

दहिवडी : शेतकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे हे नियोजित दौऱ्यानुसार पुढे निघाले होते. मात्र 'प्लिज मला साहेबांशी बोलायचं आहे' या जिव्हाळ्याचा हाकेने ते थांबले व त्यांनी त्या हाकेला साद दिली.

ठाकरे यांनी खटाव तालुक्यातील काटेवाडी येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. तिथेच जमलेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना दिलासा दिला. त्यानंतर नियोजित दौऱ्यानुसार पुढे जाण्यासाठी ते निघाले होते. मात्र त्याचवेळी कांचन कोरडे या युवतीची उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी धडपड सुरु होती. 'मला साहेबांकडे जावू द्या, मला साहेबांशी बोलायचं आहे' असा एकसारखा हेका तिने सुरक्षा रक्षकांकडे धरला होता.

दरम्यान, या तिच्या धडपडीकडे शेवटी उद्धव ठाकरे यांचे लक्ष गेले व त्यांनी तिला जवळ बोलावून काय काम आहे असं विचारले. त्यावर कांचनने साहेब माझ्यावर व माझ्या घरातील सर्वांवर शिवसेनेच्या विचारांचा पगडा असून, आमचे घर शिवसैनिकांचे आहे. तरी तुम्ही आमच्या घरी यायला पाहिजे असा हट्ट तिने धरला.

ठाकरे यांना कांचनची आग्रहाचा मागणी मोडता आली नाही. अखेर त्यांना तिचा हा हट्ट पुरवावा लागला. चालत शंभर मीटर जावून, उपलब्ध असलेल्या गाडीतून साधारण अर्धा किलोमीटर अंतरावरील कांचनच्या घरी ठाकरे गेले. कांचनचे वडील भानुदास कोरडे हे खटाव तालुका शिवसेनाप्रमुख होते, तर आता कोरेगाव विधानसभा क्षेत्राचे प्रमुख आहेत.

कट्टर शिवसैनिक असलेल्या भानुदास कोरडे यांची मुलंही शिवसेना आणि बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारी आहेत. आपल्या घरात चक्क शिवसेनाप्रमुखांचा मुलगा उद्धव ठाकरे हे आल्याचं पाहून या कुटुंबातील अबालवृद्धांचे चेहरे उजळून निघाले. सर्वजण भावनाविवश झाल्यामुळे काय बोलावे हे कुणालाच सुचत नव्हते.

शिवसेनेवरील या कुटुंबाचे प्रेम पाहून उद्धव ठाकरे यांनीही सर्व कुटुंबाला स्वतःसोबत उभं करुन छायाचित्र काढले. जेव्हा या कुटुंबातील सदस्य उद्धव ठाकरेंच्या पाया पडायला लागले, तेव्हा मी एक सामान्य माणूस आहे कुणी देव नाही, असं म्हणत  ठाकरे यांनी त्यांना थांबवलं.

साॅफ्टवेअर इंजिनिअर असलेली कांचन हिचं लग्न झालेलं असून, माणचे आमदार जयकुमार गोरे यांचं गाव असलेले बोराटवाडी हे तिचं सासर आहे. कांचन व तिचे पती निलेश बोराटे हे पुणे येथे नोकरीस आहेत. मात्र दोन्ही कुटुंबांची पार्श्वभूमी शेतकरी कुटुंबाची आहे. कांचनच्या धाडसाने बोलण्यामुळे भानुदास कोरडे यांच्या कुटुंबियांना साक्षात देव पावल्याची अनुभूती आली.

आयुष्यभर शिवसैनिक म्हणुन केलेल्या कष्टाचं फळ मिळालं. आज शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे साहेब घरी आल्याने आयुष्याचं सार्थक झालं- भानुदास कोरडे, शिवसैनिक.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT