महाराष्ट्र बातम्या

Prajakta Mali:प्राजक्ता का स्वतःला समजते भाग्यवान? वर्षावर घेतले गणरायाचे दर्शन

मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी हीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी विराजमान झालेल्या बाप्पांचं दर्शन घेतलं.

Manoj Bhalerao

Prajakta Mali meets CM:सध्या मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीने प्रेक्षकांना आपल्या अभिनयाने भुरळ घातली आहे. 'महाराष्ट्राची हास्य जत्रा' या कार्यक्रमात सुत्रसंचालन करताना ती नेहमी आपल्या चाहत्यांना दिसत असते. महाराष्ट्राच्या या लाडक्या अभिनेत्रीने वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाप्पांचं दर्शन घेतलं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाने प्राजक्ता माळी आणि इतर कलाकारांची प्रेमाने विचारपूस केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी जाऊन बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर अभिनेत्रीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन फोटो शेअर करत भावना व्यक्त केल्या. यावेळी प्राजक्ताने स्वत:ला भाग्यवान म्हटले आहे.

प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं की, "सालाबादप्रमाणे यंदाचेही वर्षी “वर्षा बंगल्यावर” जाऊन गणरायाचं दर्शन घेतलं. मा. मुख्यमंत्री व मा. श्री श्रीकांत दादा शिंदे यांचे; आम्हा कलाकारांना घरी बोलावल्याबद्दल, अत्यंत प्रेमाने पाहूणचार केल्याबद्दल मन:पुर्वक आभार. ! स्वतःला भाग्यवान समजते की दरवर्षी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना समक्ष भेटता येतय, आपल्या समस्या- अडचणी त्यांच्यासमोर मांडता येतायेत."

प्राजक्ता माळी आपल्या भेटीला एक नविन चित्रपट घेऊन आलीये. 'तीन अडकून सीताराम' हा चित्रपट लवकरच सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यानिमीत्त आयोजित केलेल्या प्रीमिअरमध्ये तिने माध्यमांशी संवाद साधला आणि चाहत्यांची भेट देखील घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jantar Mantar Protest: 'जंतर-मंतर'चा इतिहास काय? आंदोलनाचं ठिकाण कधीपासून बनलं, त्यापूर्वी काय व्हायचं; आता तीन पर्याय कोणते?

Shivsena UBT Leader Resign: ठाकरे गटाला मोठा धक्का! बड्या नेत्यानं तडकाफडकी दिला राजीनामा

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींसह INDIA आघाडीचे ८ नेते सुप्रीम कोर्टाच्या दिशेने रवाना; याचिका दाखल करणार

सर, मला अन् मित्राला वडा पाव हवाय; शाळकरी मुलाची विनंती, तुकाराम मुंढे काय म्हणाले ऐका... Video Viral

Yashasvi Jaiswal ला यष्टिरक्षण का करावसं वाटतंय? हे भलतंय खूळ डोक्यात येण्याचं कारण, घ्या जाणून...

SCROLL FOR NEXT