solapur

 

sakal

महाराष्ट्र बातम्या

आदिला नदी की नाला? 'जलसंपदा'कडे १८७४ साली आदिला नदी तर महापालिकेकडे १९१२ साली नाला म्हणून नोंद; आता काठावरील शेतकऱ्यांचे ७/१२ तपासणी, वाचा...

१५० वर्षांपूर्वी सोलापूर शहराची व्याप्ती केवळ २० चौ.कि.मी. इतकी होती; मात्र आज ती जवळपास १७८ चौ.कि.मी. पर्यंत वाढली आहे. पूर्वी या परिसरात मोठ्या प्रमाणावर शेती असल्याने पावसाच्या पाण्याच्या प्रवाहामुळे लोकवसाहतींना फारसा त्रास होत नव्हता. मात्र अलीकडे झालेल्या महापुरात आदिला नदीचे मूळ अस्तित्व ठळकपणे समोर आले.

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर शहरातील आदिला या जलप्रवाहाच्या स्वरूपाबाबत नव्याने वाद निर्माण होऊ शकतो. कारण, जलसंपदा विभागाच्या १८७४ सालच्या नकाशात हा जलप्रवाह नदी म्हणून दर्शविला आहे; तर महापालिकेच्या १९१२ सालच्या नोंदीत त्याचे नाला म्हणून रेखांकन करण्यात आले आहे. जवळपास १५० वर्षांच्या या विसंगत नोंदींमुळे ‘आदिला’च्या रेडलाइन रेखांकनाकडे महापालिका प्रशासन, पदाधिकारी तसेच बांधकाम व्यावसायिकांचे लक्ष लागले आहे. सीना नदीची उपनदी असलेल्या आदिला नदीसाठी सुमारे १५ मीटर रेडलाइन निश्चित होण्याची शक्यता आहे. त्यासाठी नदीकाठच्या शेतकऱ्यांकडील वाढीव जमिनींची माहिती महापालिका प्रशासनाकडून घेतली जात आहे.

१५० वर्षांपूर्वी सोलापूर शहराची व्याप्ती केवळ २० चौ.कि.मी. इतकी होती; आज ती जवळपास १७८ चौ.कि.मी.पर्यंत आहे. पूर्वी शहराजवळील परिसरात मोठ्या प्रमाणावर शेती होती. पावसाच्या पाण्याच्या प्रवाहामुळे लोकवस्तींना फारसा त्रास नव्हता. मात्र, अलीकडील महापुरात आदिला नदीचे मूळ अस्तित्व ठळकपणे समोर आले. दरम्यान, नदीच्या दोन्ही बाजूंना वर्षानुवर्षे गाळ साचला. ही मिळालेली वाढीव जमिनीची स्थानिकांच्या नावावर नोंद झाली. अनेक वर्षे त्या जमिनीवर शेतीही केली गेली. कालांतराने शहराचा विस्तार वाढला आणि काही शेतकरी बांधकाम व्यवसायाकडे वळले.

शहरानजिक काही जमिनी अधिकारी, सरकारी कर्मचारी व राजकीय नेत्यांनी खरेदी केल्याची चर्चा आहे. त्यामुळे वशिलेबाजीने नाल्याच्या बफर झोनपर्यंत लेआउट टाकून बांधकाम परवानग्या दिल्याचा आरोपही होत आहे. प्रशासक काळात आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी नियमानुसार रेखांकन करण्याची प्रक्रिया सुरू करण्याची मागणी केली होती. मात्र, आता काही पदाधिकारी बांधकाम व्यावसायिकांची बाजू घेत असल्याची चर्चा आहे. आदिला नदी म्हणून मान्य झाल्यास नियमानुसार दोन्ही बाजूंना सुमारे १५ मीटरपर्यंत रेडलाइन ठेवली जाऊ शकते. त्यातून अनेकांचे क्षेत्र कमी होणार आहे.

जमिनीच्या मालकांचा शोध घेणे आवश्यक

नदी की नाला याचा शोध घेताना मिळालेल्या अनेक नोंदींनुसार अनेक नवनवीन माहिती समोर येत आहे. त्यामुळे तेथील जमीनधारक नाला म्हणून रेखांकन करावे, असा अट्टहास करीत आहेत. परंतु मूळ जमीन मालकांचा शोध घेतल्यास नदी काठची जागा कोणाची, हे उघड होणार आहे.

१) नालासाठीचे रेखांकन

नाल्यासाठीचे बफर झोन रेखांकन साधारण सहा ते नऊ मीटरपर्यंत असते. शहरात ७४ नाल्यांचे रेखांकन डीपी आराखड्यात प्रथमच घेतले. या सर्वच नाल्यावर अतिक्रमण आहे. बफर झोन तर सोडाच नालाच दिसत नसल्याचे चित्र आहे.

---------------------------------------------------------------

२) नदीसाठीचे रेखांकन

नदीच्या दोन्ही बाजूला १५ मीटर ते ३० मीटरपर्यंत असते. १५ मीटरपर्यंत रेडलाइन मार्गिंग तर ३० मीटरपर्यंत ब्ल्यूलाईन असते. नदीच्या स्वरूपावरून हे रेखांकन ठरते.

रेखांकनाचे निकष...

  • एखाद्या ठिकाणाहून पाणी वाहून नेणारा नैसर्गिक जलप्रवाहातून वर्षभरात, २५ वर्षात किंवा साधारण १०० वर्षात किती पाण्याचा संचय झाला यावरून रेखांकनाचे निकष ठरतात.

  • रेड लाइन : १०० वर्षात येणाऱ्या मोठ्या पुराची सीमा

  • ब्लू लाईन : २५ वर्षात येणाऱ्या संभाव्य पुराची सीमा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT