Amit Thackeray vs Aditya Thackeray Esakal
महाराष्ट्र बातम्या

Adity Thackeray: "सुपारीवाल्या पक्षांबाबत मी..." विधानसभेपूर्वीच रंगला अदित्य-अमित ठाकरेंमध्ये सामना

Amit Thackeray: शिवसेनेचा वर्धापन दिल साजरा झाला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे आणि मनसेचे नाव न घेता त्यांनी भाजपला पाठिंबा दिल्याबद्दल त्यांच्यावर जोरदार टीका केली होती.

आशुतोष मसगौंडे

उद्धव ठाकरे-राज ठाकरे यांच्यातील वाद राज्याला सर्वश्रृत आहे. आता या सर्व घडामोडींमध्ये ठाकरेंची पुढची पिढी अदित्य आणि अमित ठाकरे यांच्यामध्येही वाद रंगल्याचे पाहालया मिळत आहे.

नुकताच शिवसेनेचा वर्धापन दिल साजरा झाला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे आणि मनसेचे नाव न घेता त्यांनी भाजपला पाठिंबा दिल्याबद्दल त्यांच्यावर जोरदार टीका केली होती.

याला अमित ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले होते. आता यावर अदित्य ठाकरे यांनीही पलटवार केला आहे.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा 58 वा वर्धापदन दिन ष्मुखानंद सभागृहात पार पडला होता. त्यावेळी केलेल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी मनसेने भाजप आणि महायुतीला पाठिंबा दिल्याबद्दल राज्य ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीका केली होती. त्यावेळी ठाकरे म्हणाले होते की, काही पक्षांनी लोकसभा निवडणुकीत भाजपला बिनशर्ट पाठिंबा दिला होता.

अमित ठाकरे यांचे प्रत्युत्तर

अमित ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंद्या बिनशर्त पाठिंब्याचा मुद्दा पकडत अदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, "आम्ही विधानसभेला अदित्य ठाकरे यांनाही पाठिंबा दिला होता. पण गेल्या चार-साडोचार वर्षांत त्यांनी काम केलेले नाही. कोव्हिड काळातही त्यांनी काहीच काम केले नाही. तुम्ही लोकांशी चर्चा केली तर त्यांच्याकडूनही तुम्हाला हेच पाहायला मिळेल. त्यामुळे अशा अपेक्षेने आम्ही विधानसभा निवडणुकीत त्यांना पाठींबा नव्हता दिला."

अदित्य ठाकरे यांनी 2019 मध्ये वरळीतून विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी राज ठाकरे यांच्या मनसेने तेथे उमेदवार उभा न करत अदित्य ठाकरेंना पाठींबा दिला होता.

अदित्य ठाकरेंचा पलटवार

अमित ठाकरे यांच्या पाठिंब्याच्या विधानानंतर आमदार अदित्य ठाकरे यांनीही पलटवार केला आहे. ते म्हणाले, "मी सुपारीवाल्या पक्षांबाबत बोलणार नाही. कारण काही पक्ष असतात निवडणुका आल्यानंतर बाहेर येता स्टंट करतात आणि जातात."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : मुंबईत पावसाची संततधार, समुद्राला मोठी भरती

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT