Aditya Thackeray Aurangabad attack stones car  
महाराष्ट्र बातम्या

Aditya Thackeray: आदित्य ठाकरेंच्या गाडीवर दगडफेक झालीच नाही; पोलिसांचा मोठा दावा

शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर एकही दगड फेकण्यात करण्यात आला नाही

सकाळ डिजिटल टीम

शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर एकही दगड फेकण्यात आला नाही. असा दावा औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी केला आहे. (Aditya Thackeray Aurangabad attack stones car )

आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे. औरंगाबादमधील कार्यक्रमादरम्यान रमाई यांची मिरवणूक थांबवल्यामुळे राडा झाला.

आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर झालेला हल्ला हा शिंदे गटातील आमदारांच्या कार्यकर्त्यांनी केला असल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. दरम्यान, पोलिसांनी चौकशी केली असता मोठा खुलासा झाला आहे.

काय म्हणाले पोलिस?

काल आदित्य ठाकरे यांची सभा मालगाव या ठिकाणी होती. त्या ठिकाणी त्यांचा ताफा तिथून निघत असताना गोंधळजन्य परिस्थिती होती. एक कॅमेरामन होते ते किरकोळ जखमी झाले आहेत. परंतु जो दावा करण्यात आला आहे. तो दावा खोटा आहे. इथे कोणतीही दगडफेक झालेली नाही. कुठल्याही प्रकारचा अनुसूचित प्रकार घडलेला नाही.

सभेदरम्यानदेखील दगडफेक झालेला नाही. सभा सुरळीतपणे पार पडली. सभा झाल्यानंतर दोघेही सुखरुप बाहेर पडले. प्राथमिक चौकशीनुसार एकही दगड गाडीवर फेकण्यात आलेला नाही.

नेमकं काय घडलं?

महालगाव येथे आदित्य ठाकरेंचा कार्यक्रम आणि रमाईंची मिरवणूक एकावेळी सुरु झाली होती. अशावेळी रमाईंची मिरवणूक थांबवल्याने किरकोळ दगडफेक झाल्याची माहिती समोर आली. यादरम्यान काही जणांनी आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यावर दगडफेक केल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर झालेला हल्ला हा शिंदे गटातील आमदारांच्या कार्यकर्त्यांनी केला असल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला. तसेच, भीमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र येणार आहे, त्यामुळं काही लोकांनी जाणीवपूर्वक एकत्र येऊ नये म्हणून हे असले प्रकार करत असतील. असही यावेळी दानवे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रज्वल रेवन्नाचा आणखी एक कारनामा; तुरुंगात जप्त केलेल्या मोबाइलमध्ये सापडले १४५ हून अधिक अश्लील व्हिडीओ

Social Media Election Rules : निवडणूक प्रचारात डीपफेक व्हिडिओ वापराल तर कारवाई; आयोगाचे राजकीय पक्षांना कडक निर्देश

'मी जे केलं ते तुम्ही करू नका...' सिंगल मदरहुडबद्दल नीना गुप्तांचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाल्या...

Chanakya Niti: नशीब बदलत नाही म्हणून निराश आहात? चाणक्य नीतीतील ‘या’ २ सवयी आजपासून अंगीकारा!

हरतालिकेची पूजा का करतात? एका क्लिकमध्ये वाचा व्रताचे महत्त्व!

SCROLL FOR NEXT