Aditya Thackeray sakal
महाराष्ट्र बातम्या

मनसे-भाजपच्या हिंदुत्वाला प्रत्युत्तर? आदित्य ठाकरेही अयोध्येला जाणार

शिवसेनेचा भाजप ‘मनसे’ला शह देण्याचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : हिंदुत्वाच्या मुद्यावरून शिवसेनेला ‘बॅकफूट’वर टाकण्याची व्यूहरचना आखलेल्या भाजप, मनसेवर कुरघोडी करत राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे हे पुढील महिन्यात अयोध्याला जाणार आहेत.

आदित्य यांच्या दौऱ्याची आतापासून मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. त्यासाठी खासदार संजय राऊत यांची टीम काम करणार असल्याचे सांगण्यात येते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही नुकतेच अयोध्याला जाणार असल्याची घोषणा केली होता. मात्र, त्यांचा दौरा अद्याप निश्चित झालेला नाही. त्याआधीच आदित्य यांच्या अयोध्या दौऱ्याची घोषणा होऊ शकते. दरम्यान मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आदित्य यांचा अयोध्या दौरा पार पडू शकतो अशी माहिती सूत्रांनी दिली.

राज्यात हिंदुत्वाच्या मुद्यावरून एकत्र येत भाजप आणि मनसेकडून शिवसेनेची कोंडी करण्याची खेळी खेळली जात आहे. त्यावरून आरोप-प्रत्यारोपही होताना दिसतात . आगामी काळात मनसे हिंदुत्वावर भर देत, निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यातूनच भाजप आणि मनसेचे मनोमिलन होण्याचा अंदाजही बांधला जात आहे. प्रार्थना स्थळांवरील भोंग्याच्या मुद्यावरून राजकारण ढवळून निघाले असताना या सगळ्या राड्यामध्ये शिवसेनेनेही हिंदुत्ववादी बाणा जपण्याचा निर्णय घेतला आहे. आदित्य यांनी आपल्या अयोध्या दौऱ्याची माहिती माध्यमांना दिली. हा दौरा यशस्वी करण्याची जबाबदारी नाशिकमधील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर सोपविण्यात आल्याचे समजते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Seena-Madha Irrigation: ‘गाढवाचंही लग्न होतंय, आमच्या पोरांचं काय?’; तुळशी ग्रामस्थांचा उद्विग्न सवाल; सीना-माढा योजनेत समावेशासाठी उपोषण

केंद्रीय मंत्री मोहोळ यांच्या ताफ्याला ओव्हरटेक करणं भोवलं, ३२ वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल; पुणे पोलिसांनी पाठवली नोटीस

Ayodhya Ram Temple security upgrade: राम मंदिरासह महत्त्वाच्या आस्थापनांच्या सुरक्षेला बळ; महिला स्नायपर्स, PAC बटालियन आणि गनर्ससाठी अत्याधुनिक शस्त्रसाठा मंजूर

Gold Rate Prediction: सोन्याचा भाव 2030 पर्यंत 2 लाखांच्या पुढे जाणार! काय आहे तज्ञांचा नेमका अंदाज?

Latest Marathi News Update : अमित शहा शनिवारी कोल्हापूर दौऱ्यावर येणार, हुपरीत जंगी कार्यक्रम

SCROLL FOR NEXT