aditya thackeray criticize cm eknath shinde over drain cleaning mumbai politics esakal
महाराष्ट्र बातम्या

Aditya Thackeray : स्वत:ला खोके आणि मुंबईकरांना धोके; आदित्य ठाकरेंची नालेसफाईवरून मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीका

मुंबईकरांचे पैसे या सरकारने जाहिरातबाजीत घातल्याचा आरोपही त्यांनी सरकारवर केला

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : ‘‘मुंबईत जिथे कधी पावसाचे पाणी साचले नव्हते, तिथे पाणी साचूनही मुख्यमंत्र्यांना मुंबईकरांच्या तक्रारी म्हणजे बदनामी वाटत आहे. हे सरकार निर्लज्ज आहे, ’’ अशा शब्दांत युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा समाचार घेतला.

‘स्वतःला खोके आणि मुंबईकरांना धोके’ हेच सरकारचे ध्येय असल्याचे ठाकरे म्हणाले. मुंबईकरांचे पैसे या सरकारने जाहिरातबाजीत घातल्याचा आरोपही त्यांनी सरकारवर केला.

मुंबईतील पावसामुळे शनिवारी काही भागांत पाणी साचून लोकांचे हाल झाले. पाणी साचल्याच्या मुद्यावरून ठाकरे यांनी शिंदे यांना लक्ष केले आणि नालेसफाई झाली नसल्याचा आरोप केला. त्यावर मात्र, पावसाचे स्वागत करा, पाणी तुंबल्याची तक्रार काय करता त्यासाठी वेळ असल्याचा टोला शिंदे यांनी लगावला.

त्याला आदित्य यांनी पत्रकार परिषदेत जोरदार उत्तर दिले. आदित्य म्हणाले, ‘‘पावसाळ्यात मुख्यमंत्री नाल्यात उतरले आणि सफाईचे आश्वासन दिले. प्रत्यक्षात मात्र, नालेसफाई झालीच नाही. तरीही, मुंबईच्या तक्रारींकडे मुख्यमंत्री बोट दाखवत आहेत.

हा निर्लज्जपणा असून, हा प्रकार आतापर्यंत पाहिला नाही. याआधी मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे हे सगळीकडे फिरून कामांची पाहणी करीत होते. पावसाळ्यापूर्वीची कामे करीत होते. मात्र, सध्याचे मुख्यमंत्री रस्त्यांच्या घोटाळ्यात अडकले आहेत.

मुंबईसाठी एकही बैठक घेतली नाही

यापूर्वी मुंबईत पावसाळ्यापूर्वीची कामे ३१ मेपर्यंत पूर्ण व्हायची. परंतु, आता नको तिथे रस्त्यांची खोदाई केली

असून, लोकांची गैरसोय होत असतानाही मिंधे गटातील काही नेता पुढे येत नाही. ठाकरे सरकार पाडण्यासाठी जेवढ्या बैठका घेतल्या, पण मुंबईकरांच्या कामासाठी एक बैठक घेतली असती, तर ही वेळ आली नसती, असा चिमटाही त्यांनी शिंदे यांना काढला.

‘आदित्य ठाकरे यांना अटक होईल’

सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे सचिव सूरज चव्हाण यांच्या केलेल्या चौकशीतून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना अटक होईल, असे सांगून भाजपचे आमदार नितेश राणे यांनी खळबळ उडवून दिली आहे.

खोके मागितल्याचे १३ व्हीडिओ आपल्याकडे आहेत असे सांगत, आम्हाला उगाच धमक्या दिल्या तर अंगावर एक कपडाही शिल्लक ठेवणार नाही, अशा शब्दांत त्यांनी ठाकरे यांना दम भरला.

विरोधकांच्या पाटण्यातील बैठकीनंतर शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोचरी टीका केली. त्याला फडणवीस यांनीही त्यांच्याच भाषेत उत्तर दिल्यानंतर ठाकरे आणि भाजप नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे यांचा रविवारी समाचार घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Edible Oil Rate : महागाईच्या होरपळीत खाद्यतेलाचाही ‘भडका’; वर्षभरात भाव १० ते १८ टक्क्यांनी वाढले; ग्राहकांना फटका

Chakan Road Work Issue : दिरंगाईच्या दलदलीत रुतले उद्योग! चाकण औद्योगिक वसाहतीतील कॉर्निंग-रोहकल जंक्शन मार्गाचे काम तीन वर्षांपासून ठप्प

Satyendra Jain: आप नेते सत्येंद्र जैन यांना अटक! एसीबीची मोठी कारवाई; अरविंद केजरीवाल यांचा भाजपवर संताप

Sanjay Shitole : जिद्दीच्या जोरावर कोकडेवाडीतील शेतकरीपुत्राचे यश; दुय्यम निबंधक या पदावर झाली निवड

ACB Crime : ‘एनओसी’साठी ६५ हजारांची मागणी; ३५ हजार घेताना उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT