Aditya Thackeray Hundreds of Shiv Sainiks from Worli joined the Shinde group  esakal
महाराष्ट्र बातम्या

Eknath Shinde: आदित्य ठाकरेंना धक्का: शेकडो शिवसैनिकांचा शिंदे गटात प्रवेश

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना वरळीमध्ये मोठा धक्का

सकाळ डिजिटल टीम

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना वरळीमध्ये मोठा धक्का बसला आहे. वरळीमधील शेकडो शिवसैनिकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. वरळी हा आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ आहे. त्यांच्याच मतदारसंघातील शेकडो शिवसैनिकांनी आज शिंदे गटात प्रवेश केल्याने हा आदित्य ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.(Aditya Thackeray Hundreds of Shiv Sainiks from Worli joined the Shinde group )

ऐन दसरा मेळाव्याच्या तोडांवर शेकडो शिवसैनिक शिंदे गटात सामील झाले आहेत. यापूर्वी देखील शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिंदे गटात सामील झाले आहेत. कोळीवाड्यातील ५०० कार्यकर्ते आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी 'वर्षा' बंगल्यावर जात शिंदे गटात प्रवेश केला. या प्रवेशावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्याशी संवाद साधला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेत मोठी फूट पडली आहे. ४० आमदार, १२ खासदार यांसह अनेक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे. यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मोठी अडचण झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्या उठवानंतर शिवसेनेत सुरू झालेली गळती रोखण्याचं मोठं आव्हान आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यापुढे आहे.

मिलिंद नार्वेकरही शिंदे गटाच्या वाटेवर?

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वीय्य सहायक आणि त्यांच्या अत्यंत विश्वासातील मिलिंद नार्वेकर शिंदे गटात दाखल होणार असल्याचा दावा पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे.

दसरा मेळाव्याला शिवसेनेतील काही आमदार आणि नेते शिंदे गटात सहभागी होणार असल्याची चर्चा सुरू असतानाच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सेवक चम्पासिंग थापा यांच्यानंतर आता मिलिंद नार्वेकर शिंदे गटात सहभागी होतील, असा दावा गुलाबराव पाटील यांनी केला आहे.

मिलिंद नार्वेकर यांचे एकनाथ शिंदे यांच्याशी चांगले संबंध आहेत. शिवसेनेत फूट पाडल्यानंतरही गणेशोत्सवात एकनाथ शिंदे गणपती दर्शनासाठी मिलिंद नार्वेकर यांच्या घरी गेले होते. त्यामुळे ते एकनाथ शिंदे यांच्या गटात जाणार याबाबत चर्चा तेव्हापासूनच सुरू झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supriya Sule: ‘कर्जमाफी अन् सातबारा कोरा होईपर्यंत स्वस्थ बसू देणार नाही’; पंढरपुरात सुप्रिया सुळे आक्रमक, तुरुंगात जावे लागले तरी चालेल

'अंबा येडू दोघी बहिणी…’ ऐश्वर्या नारकरांसोबत लेकीचाही ठसकेबाज डान्स! VIDEO VIRAL

Asian Games, IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कशी असू शकते Playing XI? कुठे पाहाणार उपांत्यपूर्व सामना?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक पेपरफुटीप्रकरणी मोठी अपडेट

सरकारने माझ्या मागण्या मान्य केल्या, ३० दिवसांचा रिचार्ज, डेटाशिवाय प्लान मिळणार; राघव चड्ढांची पोस्ट

SCROLL FOR NEXT