Asian Games, IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कशी असू शकते Playing XI? कुठे पाहाणार उपांत्यपूर्व सामना?

Asian Games 2026 India vs Afghanistan, Quarter-Final Live Streaming: आशियाई क्रीडा २०२६ स्पर्धेत भारत आणि अफगाणिस्तान संघात उपांत्यपूर्व सामना होणार आहे. या सामन्यात जसप्रीत बुमराहचे पुनरागमन होण्याची शक्यता आहे. हा सामना कुठे पाहाता येईल जाणून घ्या.
India vs Afghanistan  Asian Games 2026

Team India | Asian Games 2026

Sakal

Updated on: 

Asian Games 2026 India vs Afghanistan, Predicted Playing XI: भारतीय टी२० क्रिकेट संघ सध्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी आहे. भारताला या स्पर्धेत थेट उपांत्यपूर्व फेरीचे तिकीट मिळाले होते. त्यामुळे आता श्रेयस अय्यरच्या नेतृत्वातील भारतीय संघाच्या मोहिमेला सोमवारी सुरुवात होणार आहे. भारताचा उपांत्यपूर्व सामना अफगाणिस्तानविरुद्ध होणार आहे.

अफगाणिस्तानने पहिल्या फेरीतून अ गटात दुसरा क्रमांक मिळवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश पक्का केला आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील उपांत्यपूर्व फेरीचा सामना सोमवारी कोरोगी स्पोर्ट्स पार्क, निशिन येथे होणार आहे.

India vs Afghanistan  Asian Games 2026
Asian Games : स्क्वॅशमध्ये दोन सुवर्णपदकं हुकली! अनाहत-अभय यांना रौप्य, तर बॉक्सिंगमध्ये दोन मेडल्स पक्के
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com