Aditya Thackeray likely to get environment ministry  
महाराष्ट्र बातम्या

शिवसेनेचा निर्णय; आदित्य ठाकरेंना मिळणार 'हे' खाते

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होऊनही खातेवाटपाचे घोंगडे भिजत पडले असताना शिवसेनेचे युवा मंत्री आदित्य ठाकरे यांनी मात्र पर्यावरण खात्याची जबाबदारी स्वीकारण्यास उत्सुकता दाखविली आहे.

आदित्य ठाकरे या मंत्रिमंडळात नेमकी कोणती जबाबदारी पार पाडणार, याविषयी सर्वांच्या मनात उत्सुकता होती. पर्यावरण आणि क्रीडा या खात्यांबाबत आदित्य अधिक कल्पक काम करण्याची शक्‍यता असल्याने ही खाती त्यांच्याकडे सोपविली जाण्याची शक्‍यता आहे. प्लॅस्टिकबंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी आदित्य यांनीच पुढाकार घेतला होता. रामदास कदम पर्यावरणमंत्री असताना आदित्य यांनी यासाठी पाठपुरावा केला होता.

शिवसेनेत नाराजीचा स्फोट; हे माजी मंत्री पुन्हा मातोश्रीकडे फिरकणार नाहीत

मेट्रो कारशेडसाठी आरेमध्ये झालेली वृक्षतोड रोखण्यासाठीही त्यांनी पुढाकार घेतला होता. पर्यावरण खात्याशी संबंधित विषयांमध्ये तरुणांना सोबत घेऊन अनेक गोष्टी करता येण्यासारख्या असल्याने आदित्य ठाकरे यांना पर्यावरण खाते मिळण्याची शक्‍यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cockroach Janata Party : कॉक्रोच जनता पार्टीचे सोशल मीडिया अकाउंट्स हॅक; डिजिटल हल्ल्याने खळबळ, समर्थक आक्रमक!

Green Card Rules Changes : डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा भारतीयांना मोठा धक्का; ग्रीन कार्डसाठीचे नियम बदलले, आता मायदेशी परतावं लागणार...

Marathi Live News update: अकरावी प्रवेश प्रक्रियेचा फज्जा, दुसऱ्या दिवशीही गोंधळ

Konkan Heritage: कोदवली येथे तीन मराठाकालीन शिलालेख; फेब्रुवारी १८४५ मध्ये झाला श्री शंकरेश्वराचा जीर्णोद्धार, बंदर प्रशासनाचा इतिहास

Beed Encroachment: कचऱ्यात फेकली आजीची भाजी; अतिक्रमणविरोधी कारवाई, बीडमध्ये भाजीविक्रेत्या वृद्धेला अश्रू अनावर..

SCROLL FOR NEXT