Aditya Thackeray News esakal
महाराष्ट्र बातम्या

Shiv Sena Symbol Row : 'विजय आमचाच होईल, कारण…'; आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला विश्वास

सकाळ डिजिटल टीम

Shiv Sena Symbol Row : शिवसेना कोणाची यावरून सुरू असलेल्या ठाकरे आणि शिंदे गटातील वादाकडे सर्व राज्याचे लक्ष लागलेले आहे. यादरम्यान आज शिवसेना आणि धनुष्यबाण कोणाचा यावरून केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुरू असलेली सुनावणी ३० जानेवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. यानंतर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

निवडणूक आयोगासमोर आज झालेल्या दोन्ही गटाच्या युक्तीवादानंतर सोमवारी लेखी उत्तरे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच वादावार आता ३० जानेवारीला पुढील सुनावणी होणार आहे. यानंतर आदित्य ठाकरे यांनी विजय आमचाच होईल असे म्हटले आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले की, निवडणुक आयोगाला लेखी उत्तर देखील देऊच. गेली सहा ते सात महिने घटनाबाहेर सरकार स्थापन झालं आहे. असं देशात कधीही झालं नव्हतं. कायदे तोडून-मोडून हे सत्तेत आले आहेत. एका व्यक्तीच्या राक्षसी महत्वकांक्षेसाठी देशाचं, राज्यचं आणि जनतेचं नुकसान होतंय एवढा प्रकार देशाने कधीच बघीतला नव्हता.

हेही वाचा - मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

सामान्य नागरीक म्हणून विचार करा, ४० लोक गद्दारी करून दुसऱ्या पक्षात जातात तेथे गेल्यानंतर लाज आणि हिंम्मत ठेवून निवडणूकांना सामोरे जाणं गरजेचं असतं. कधीही निवडणूकीला सामोरे न जाता असं सरकार कधी स्थापन झालं नव्हतं त्यामुळे हे घटनाबाह्य सरकार आहे.

३० जानेवारीला होणार सुनावणी

सुनावणीला पुन्हा पुढची तारीख मिळाल्यावरून बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, विजय आमचाच होणार, विजय सत्याचाच होतो. महत्वाचा प्रश्न हा आहे की, किती दिवस हा विषय आपण प्रलंबित ठेवणार आहोत. किती दिवस पुढची तारीख करत राहाणार आहोत?

देशातील कायदा संविधानाचा अनादर करून असं सरकार बसू शकतं का आणि एका राज्याला स्वतःच्या महत्वकाक्षेसाठी मागं नेऊ शकतं का? हा विचार समोरच्या पक्षाने करण्याची गरज आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

या सुनावणीच्या वेळी विजय आमचाच होईल कारण आपल्या देशात सत्य मेव जयते याला महत्व आहे सत्ता मेव जयते याला नाही असेही आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT