Aditya Aditya Thackeray said, we are going to get the blessings of Lord RamaThackeray
Aditya Aditya Thackeray said, we are going to get the blessings of Lord RamaThackeray Aditya Thackeray said, we are going to get the blessings of Lord Rama
महाराष्ट्र

‘संघर्षाची वेळ संपली; आम्ही प्रभू रामाचा आशीर्वाद घेणार आहोत’

सकाळ डिजिटल टीम

संघर्षाची वेळ संपली आहे. तेव्हा आम्हीही होतो. आता न्यायालयाच्या निर्णयाने मंदिर निर्माणाचा मार्ग मोकळा झाला आहे. आम्ही रामलल्लाच्या दर्शनासाठी अयोध्येत जात आहोत, असे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) एएनआय या वृत्तसंस्थेची बोलताना म्हणाले. (Aditya Thackeray said, we are going to get the blessings of Lord Rama)

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचा अयोध्या दौरा राजकीय नसेल, असे संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी स्पष्ट केले आहे. आदित्य यांच्यासोबत १५ जूनला मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि युवासैनिक अयोध्येत जाणार असल्याचे राऊतांनी स्पष्ट केले होते. आदित्य यांच्या दौऱ्याची सगळी तयारी जवळपास पूर्ण झाल्याचे संजय राऊत यांनी सांगितले होते.

अयोध्या दौऱ्यावरून मनसे आणि शिवसेनेत (Shiv Sena) आरोप प्रत्यारोप सुरू झाले होते. शिवसेनेने जोरदार तयारी केली होती. विशेष म्हणजे शिवसेनेने अयोध्येत याची पोस्टरबाजी केली आहे. आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याचे पोस्टर अयोध्येत लावण्यात आले. यावर ‘असली आ रहा है, नकली से सावधान’ असे लिहिले होते. शिवसेनेने पोस्टरच्या माध्यमातून राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता.

‘आम्ही रामलल्लाच्या दर्शनासाठी (अयोध्येत) जात आहोत. ‘संघर्ष’ची वेळ संपली आहे, तेव्हा आम्हीही होतो आणि आता न्यायालयाच्या निर्णयाने मंदिर निर्माणाचा मार्ग मोकळा झाला आहे. आता आम्ही प्रभू रामाचा आशीर्वाद घेणार आहोत’ असे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs SRH Live IPL 2024 : सीएसकेची संथ सुरूवात; भुवनेश्वरनं दिला पहिला धक्का

Buss Accident : उत्तर प्रदेशमध्ये भीषण बस अपघात; ट्रकच्या वेगाने बस कापून निघाली, सात जणांचा मृत्यू

T20 WC 2024 India Squad : विकेटकिपर निवडणं UPSC क्रॅक करण्यापेक्षाही झालं अवघड; 'यांनी' निवडसमितीची डोकेदुखी वाढवली

Uttarakhand Forest Fire : उत्तराखंडमध्ये जंगलाला भीषण आग! वणव्यांमुळे ३३.३४ हेक्टरवरील झाडे जळून खाक

Lok Sabha Election : PM मोदींबद्दलच्या टिप्पणीनंतर भाजपमधून हकालपट्टी, आता पोलिसांनी केली अटक; जाणून घ्या प्रकरण

SCROLL FOR NEXT