Aditya Thackeray Slam Devendra Fadnavis over one day before shivsena vardhapan din tweet  
महाराष्ट्र बातम्या

Aditya Thackeray : 'त्या' जाहिरातीची धास्ती! 'वर्धापनदिनाआधीच शिवसेनेला दिल्या शुभेच्छा'; आदित्य ठाकरेंचं वर्मावर बोट

रोहित कणसे

उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. फडणवीसांनी शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा एक दिवस आधीच दिल्यावरून त्यांनी दिल्लीहून आदेश आले असतील असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला आहे

शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या महाशिबीरात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना आदित्य ठाकरे म्हणाले की, उद्या शिवसेनेचा वर्धापण दिन आहे, पण काही लोकांनी एका जाहिरातीची इतकी धास्ती घेतली आहे की, उद्याचा वर्धापन दिनचं आजच ट्विट करून टाकलं आहे. या घटनाबाह्य सरकारचे उपमुख्यमंत्र्यांनी उद्याच्या शुभेच्छा आजच देऊन टाकल्या आहेत. कदाचित दिल्लीहून निरोप आला असेल की आजच ट्वीट करा अन्यथा पाहा.

आदित्य ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, परवा म्हणजे २० तारखेला सर्वात महत्वाचा दिवस आहे. जागतिक खोके दिन. राष्ट्रीय नाही जागतीक आहे. कारण ३३ देशांनी ज्याची दखल घेतली असा हा दिवस आहे.

पुढे बोलताना आदित्य ठाकरेंनी त्यांच्या लंडन प्रवासादरम्यानचा मजेशीर किस्सा देखील सांगितला ते म्हणाले की, परवा लंडनमध्ये होतो. तिथे एक मित्र भेटला होता त्याने विचारलं की पुढचा कार्यक्रम काय आहे वगैरे, मी त्याला सांगत होतो की १८ तरखेला आमचं शिबीर आहे, १९ तारखेला वर्धापनदिन साजरा केला जाईल आणि २० तारखेला ५० खोके इतकं बोललो तर बाजूला एक फॉरेनर होता तो देखील म्हणाला एकदम ओख्के… यावर एकच हशा पिकला.

देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत शिवसेनेच्या वर्धापण दिनानिमीत्त शुभेच्छा दिल्या होत्या. मात्र चूक लक्षात येताच ते ट्विट डिलीट करण्यात आलं. या ट्विटमध्ये हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर खऱ्या अर्थाने वाटचाल करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना पक्षाला वर्धापनदिनाच्या खूप खूप शुभेच्छा असे फडणवीस म्हणाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Mukul Choudhary? लखनौ सुपर जायंट्सचा 'टायगर'! कोलकाता नाइट रायडर्सच्या जबड्यातून विजय खेचून आणणारा नायक...

KKR vs LSG Live: मुकुल चौधरीने KKR च्या हातून मॅच खेचून नेली; लखनौचा रोमहर्षक विजय, IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

Strait of Hormuz: 'होर्मुझ'मधून जायचं असेल तर 'क्रिप्टोकरन्सी' किंवा चिनी 'करन्सी'मध्ये व्यवहार करा! इराणकडून नियमांची यादी

ICC WTC Teams: आयसीसी स्पर्धेत मोठा बदल! आता WTC मध्ये १२ संघांचा समावेश; ३ नव्या संघांना मिळणार संधी, पण कोणत्या?

Government Employee: सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना ३१ मार्च २०२७ पर्यंत स्थगिती; केंद्राचे सर्व राज्यांना निर्देश

SCROLL FOR NEXT