Aditya Thackeray  esakal
महाराष्ट्र बातम्या

Aditya Thackeray : …इथे गद्दारीला स्थान नाही; बाजार समिती निवडणूक निकालांवरून आदित्य ठाकरे कडाडले!

रोहित कणसे

राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे निकाल जाहीर होताच या निकालावरून भविष्यातील राजकीय समिकरणांबद्दल अंदाज वर्तवले जात आहेत. राज्यातील 147 कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी पार पडलेल्या निवडणूकांचे निकाल शनिवारी समोर आले आहेत. या निवडणूकांमध्ये महाविकास आघाडीविरुद्ध शिवसेना- भाजप युती (BJP) अशी थेट लढत या निवडणुकीत पाहायला मिळाली.

दरम्यान या निवडणूकीत धक्का बसलेल्यांमध्ये सत्ताधारी पक्षातील आमदार, खासदार आणि मंत्र्यांचा समावेश आहे.

दरम्यान राज्यभरातील या निकालावरून उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटाला टोला लगावला आहे. त्यांनी महाविकास आघाडीला या निवडणूकीत मोठं यश मिळाल्याचा दावा केला आहे. सोबतच इथे गद्दारीला स्थान नाही असेही म्हटले आहे.

आदित्य ठाकरेंनी बाजार समिती निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर ट्वीट केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडीला दणदणीत यश प्राप्त झाले आहे. महाराष्ट्राने पुनश्च दाखवले की इथे गद्दारीला स्थान नाही आणि हेच आपल्याला येत्या लोकसभा, विधानसभा, महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत दिसणार आहे.

तर शिवसेना-भाजपला शेतकऱ्यांनी नाकारल्याचे चित्र पाहिला मिळत आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीचा सर्वात जास्त बाजार समित्यांवर झेंडा फडकला आहे.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे, "बाजार समिती निवडणुकीत शिवसेनेसह महविकास आघाडीस उत्तम यश मिळाले. गद्दार आमदारांचा शेतकरी मतदारांनी करेक्ट कार्यक्रम केलं. हेच महाराष्ट्राचे जनमानस आहे. ही सुरुवात आहे.. महानगर पालिका, विधानसभा, लोकसभा निवडणुकीत असाच जोरदार कार्यक्रम होईल.लोकांनी खोके लाथाडले. हे स्पष्ट दिसते. हिम्मत असेल तर महानगर पालिका निवडणुका घेऊन दाखवा!"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Chandgad MD Drugs Case: चंदगड पोलिस, पालकांची जबाबदारी वाढली; हाजगोळी ड्रग्ज प्रकरण; मुलांच्या वर्तणुकीकडे लक्ष ठेवण्याची गरज

Sparrow Chick Rescue : घरट्यातून पिल्लू खाली पडलं अन्...; चिमणीची लेकरासाठी जीवाचा आकांत करणारी धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, हॉस्पिटलबाहेरील 'तो' प्रसंग नक्की काय?

Latest Marathi News Live Update : कंत्राटदाराने जीवन संपवल्याने सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

Vastu Shastra: झाडू ठेवण्याचीही असते योग्य दिशा? वास्तुशास्त्रातील ‘हा’ नियम जाणून घ्या

SCROLL FOR NEXT