Aditya Thackeray sakal media
महाराष्ट्र बातम्या

आदित्य ठाकरेंना धमकी देणाऱ्यास अटक; निघाला सुशांत सिंह राजपूतचा फॅन

मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने बंगळुरूवरून या आरोपीला अटक केली.

सुधीर काकडे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे पुत्र आणि मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना जीवे मारणारी धमकी देणाऱ्या आरोपीला गजाआड करण्यात आलं आहे. या प्रकरणात मुंबई क्राईम ब्रांचच्या सायबर सेलने (Mumbai Police) जयसिंग राजपूत नावाच्या व्यक्तीला बंगळुरूहुन अटक केली आहे. राजपूत हा स्वतः अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा फॅन असल्यातं समजतं आहे. आठ डिसेंबरच्या रात्री राजपूतने आदित्य ठाकरेंना यांना फोन केला होता.

आदित्य ठाकरे यांना फोनवर मॅसेज करून धमकी देण्यात आली होती. आदित्य ठाकरेंनी फोनवर कोणतेही उत्तर न दिल्याने राजपूतने आदित्य ठाकरे यांना मेसेज केला होता. याच प्रकरणात मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने तपासाटी चक्र वेगाने फिरवत आरोपीला अटक केली आहे. 'सुशांत सिंह राजपूतला तु मारलं, आता नंबर तुझा' या आशयाचा मेसेज राजपूतने आदित्य ठाकरे यांना केला होता.

दरम्यान, या प्रकरणातील आरोपीने आदित्य ठाकरेंना धमकीच्या मेसेजसह अश्लील शब्दात शिवीगाळ देखील केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ramdas Athawale: मोदींचा सामना करणे ‘बच्चों का खेल नहीं’; केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा राहुल गांधी यांना चिमटा

Vilas Chavan Success Story : दगड फोडणाऱ्या हातांनी घडवला 'साहेब'; मजुराचा मुलगा बनला अधिकारी, विलास चव्हाणांची MIDC अभियंता पदाला गवसणी

Latest Marathi News Live Update : पिंपरी चिंचवडमधील पूर्णत्वास आलेला पूल धोक्याचा

Konkan Holi Festival : एकमेकांच्या अंगावर फेकली जातात जळती लाकडे, होळीला रंगते देव-दानव युद्ध ! कोकणातील 'या' गावात शेकडो वर्षांची परंपरा

Graded Driving License: काय आहे ग्रेड आधारित ड्रायव्हिंग लायसन्स? वाहतूक नियम भंग केल्यास रद्द होणार; नितीन गडकरी यांची घोषणा!

SCROLL FOR NEXT