Aditya Thackeray Sakal
महाराष्ट्र बातम्या

Aditya Thackeray : "मला आईपण ओरडत होती..."; रोज निळ्या रंगाचा शर्ट का घालतो? स्वतःच सांगितलं!

आदित्य ठाकरे सध्या मराठवाडा दौऱ्यावर असून रोजच ते सध्या चर्चेत आहेत.

सकाळ डिजिटल टीम

आदित्य ठाकरे सध्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून ते गावोगावी जाऊन सभा घेत आहेत. अशाच एका ठिकाणी त्यांना त्यांच्या स्टाईलबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी उत्तरही दिलं आहे.

मराठवाडा दौऱ्यादरम्यान आदित्य ठाकरेंना माध्यम प्रतिनिधींनी त्यांच्या शर्टविषयी विचारलं. आदित्य ठाकरे बहुतांश वेळा निळ्या रंगाचा शर्ट आणि जीन्स अशाच पोशाखामध्ये दिसतात. त्याबद्दलच माध्यमांनी त्यांना प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी हसत हसत उत्तर दिलं आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले, "रोज असा शर्ट घालतो कारण सकाळी उठल्यावर विचार करावा लागत नाही. रोज गडबड असते, आपण एक टीशर्ट आणि जीन्स घातली की आपण मोकळं. रोज काय घालायचं हा प्रश्न पडत नाही. बाकी काही कारण नाही. मला आई पण ओरडत होती की जरा वेगळ्या रंगाचे कपडे घाल."

सभेतल्या गोंधळामुळे आदित्य ठाकरेंची राज्यभर चर्चा

जालनामध्ये आदित्य ठाकरे यांची सभा होती. या सभेच्या वेळी गोंधळ झाला. काही जणांनी दगडफेक केल्याचंही बोललं जात आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांची राज्यभर चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Meenakshi Shinde: ‘नाव घेतल्याने कोणी आरोपी ठरत नाही : मीनाक्षी शिंदे; ‘तपास होऊ द्या, सत्य बाहेर येईल’ शिंदेंचा पलटवार

Dino Morea: राहत्या घरातून डिनो मोरियाला अटक! मिठी नदी गैरव्यवहार प्रकरणाने अभिनेत्याच्या अडचणी वाढल्या

ST NCMC Card: तिकिटाचे पैसे कटल्यानंतर पुन्हा ६० रुपये गायब;एनसीएमसी कार्डचा पहिल्याच दिवशी फटका, ज्येष्ठाची तक्रार

Latest Marathi News Live Update : ठाण्यातील गुंडगिरीला अमित शहा जबाबदार- संजय राऊत

Ravikiran Ingawale : 'शरद कोराणे यांना कारागृहात इंजेक्शन देऊन संपवलं...'; रविकिरण इंगवलेंच्या व्हायरल ऑडिओमुळे खळबळ, कोराणे कुटुंबाची सखोल चौकशीची मागणी

SCROLL FOR NEXT