Aditya Thackeray
Aditya Thackeray सकाळ
महाराष्ट्र

BLOG: आदित्य ठाकरेंच्या धार्मिक अयोध्या दौऱ्याचे राजकीय अर्थ..

निकिता जंगले

बुधवारी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचा अयोध्या दौरा बराच गाजला. या दौऱ्यादरम्यान शिवसेनेचं अयोध्येत दिसलेलं शक्तिप्रदर्शन चर्चा विषय ठरला. आदित्य ठाकरेंच्या विशेष अयोध्या दौऱ्यात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही हजेरी लावली. आदित्य ठाकरे यांच्या सोबत सावली सारखी पाठराखण करणारे संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यासाठी शेकडो शिवसैनिक मुंबईहून उत्तर प्रदेशात दाखल होतात, याला आपण राजकीय दौरा म्हणावा की नाही, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.

या दौऱ्यात आदित्य ठाकरे यांची भाषणादरम्यान गाजलेलं एक विधान म्हणजे "हा कोणताही राजकीय दौरा नाही. मी केवळ दर्शनासाठी आलो आहे." एकंदरीत आदित्य ठाकरेंचं हे विधान आणि दौऱ्यादरम्यानची चित्रे यात मोठा विरोधाभास जाणवला आणि त्यातूनच प्रश्न निर्माण झाला की आदित्य ठाकरे यांचा अयोध्या दौरा खरंच राजकीय नव्हता का?

आदित्य ठाकरे जर फक्त दर्शनासाठी आले असते तर एवढा मोठा वाजागाजा कशाला? मुळात या दौऱ्यातून आदित्य ठाकरे यांना पुढे आणण्याचं उद्दिष्ट होतं असंही बोलले जात आहे. कारण त्यांना फक्त दर्शन घ्यायचं असतं तर ते शांतपणे घेऊ शकत होते पण त्यांच्या या दौऱ्याला जो राजकीय रंग मिळालाय त्यातूनच हे प्रकरण अधिक संशयाकडे वळते.

आदित्य ठाकरे यांची राजकीय पार्श्वभूमी पाहली तर 2010 मध्ये युवा सेनेचे अध्यक्ष, 2018 मध्ये शिवसेनेचे नेते आणि त्यांनतर 2019 मध्ये विधानसभेची निवडणूक जिंकली आणि राज्याचे पर्यावरण मंत्री म्हणून कार्यरत आहे. पण तुम्ही अनुभवलं का की गेल्या काही दिवसांपासून आदित्य ठाकरे हे राजकीयदृष्ट्या अधिक सक्रिय झाल्याचे चित्र आहे.

'आपल्या खात्याचे काम बरे आणि आपण बरे' अशी भूमिका ठेवणारे आदित्य ठाकरे यांना आता सक्रिय होण्याची गरज का वाटू लागली? कोणत्याही मुद्द्यावर बोलायला टाळणारे अलीकडच्या काळात बिनधास्तपणे राजकीय प्रतिस्पर्ध्यांवर टीका करताना दिसतात? एवढं बळ आता त्यांना आलं कुठून? या प्रश्नांच्या मागे तुम्हाला अनेक उत्तरं मिळतील.

या शिवाय आदित्य ठाकरे यांना बळ द्यायला शिवसेनाही कुठेही मागे नाही. याचं ताजं उदाहरणं म्हणजे पक्षाने मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी आदित्य ठाकरे यांच्यावर सोपवली आहे. या निवडणुकीची रणनीती ठरवण्यापासून ते कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेण्यात संदर्भात आदित्य ठाकरे यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आली आहे आणि यात हा अयोध्या दौरा, जो दर्शनाच्या नावाखाली शिवसेनेचं शक्तिप्रदर्शन असो किंवा राजकीय रंग दाखवून गेला.

आदित्य ठाकरेंच्या या दौऱ्यात संजय राऊतांच सोबत असणं यातून अनेक निष्कर्ष निघतात. संजय राऊतांना आता राजकीय कुरुक्षेत्रावर आदित्य ठाकरेंची पाठराखण करायची तर जबाबदारी दिली नाही ना? असाही प्रश्न निर्माण होतो.

या सर्व बाबींवरून एकच गोष्ट साध्य होतंय की शिवसेना आता आदित्य ठाकरेंना रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहे आणि त्यासाठीच आतापासूनच हे छोटे छोटे प्रयत्न सुरू आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: प्रज्वल्ल रेवण्णाविरोधातील फास आणखी आवळला! निघालं अटक वॉरंट

IPL 2024 RCB vs CSK Live Score: बेंगळुरूला दुसरा धक्का! अर्धशतकानंतर डू प्लेसिस आऊट, पण विकेटमुळे झाला ड्रामा

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

Video: 'सिग्मा मेल' म्हणून केलं रोस्ट, धमकी मिळाल्यावर कॅरी मिनाटीने टेकले गुडघे, काय होतं व्हिडिओमध्ये? पाहाच

MI vs LSG: मुंबईच्या पराभवानंतर रोहितबरोबर नीता अंबानींची आधी गहन चर्चा अन् मग ड्रेसिंग रुममध्ये दिलं स्पेशल मेडल, Video व्हायरल

SCROLL FOR NEXT