mla shahaji patil and aaditya thakare sakal
महाराष्ट्र बातम्या

बंडखोर आमदार शहाजीबापूंच्या सांगोल्यात बुधवारी आदित्य ठाकरे! शेतकऱ्यांशी संवाद

युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे बुधवारी (ता. ९) सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. सांगोल्यातील बाधित शेतकऱ्यांशी संवाद साधून ते जेजुरीला जाणार आहेत.

तात्या लांडगे

सोलापूर : जुलै ते ऑक्टोबर या काळातील अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अजून सप्टेंबर व ऑक्टोबरमधील बाधित शेतकऱ्यांना भरपाई मिळालेली नाही. या पार्श्वभूमीवर युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे बुधवारी (ता. ९) सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. सांगोल्यातील बाधित शेतकऱ्यांशी संवाद साधून ते जेजुरीला जाणार आहेत.

‘एसडीआरएफ’ निकषात बदल करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने शेतकऱ्यांना दिलासा दिला. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना अतिवृष्टीची भरपाई मिळेल, अशी ग्वाही दिली होती. पण, सोलापूर जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना ऑगस्टमधील नुकसानीपोटी (अतिवृष्टी व सततचा पाऊस) १४७ कोटी दिले. तो निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झाला. परंतु, सप्टेंबर व ऑक्टोबरमधील भरपाई अजून मिळालेली नाही. जिल्हा प्रशासनाने सप्टेंबर व ऑक्टोबरमधील अतिवृष्टीच्या भरपाईपोटी ३६ कोटी आणि सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्यांसाठी पावणेसहा कोटींची मागणी केली आहे. त्यात सांगोला, दक्षिण सोलापूर, करमाळा, माढा, मंगळवेढा तालुक्यातील अतिवृष्टी बाधितांचा आणि बार्शी व अक्कलकोट वगळता अन्य तालुक्यांमधील सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर त्यांचा हा दौरा असल्याची माहिती सोलापूर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख अनिल कोकीळ यांनी दिली.

सांगोला तालुक्यातच का दौरा?

गुवाहाटीला गेल्यावर ‘काय डोंगार, काय हाटील, काय झाडी, सगळं ओक्केमधी हाय’ म्हणत देशभर पोचलेल्या शहाजी पाटलांचे वजन वाढले आहे. सांगोल्यातील शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील हे सध्या शिंदे गटाकडे गेले आहेत. सातत्याने ते उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादीतील नेत्यांवर टीका करीत आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांच्याच तालुक्यातील शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून सरकारकडे मदतीची मागणी करण्यासाठी आदित्य ठाकरेंचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रवाशांनो, कृपया लक्षात द्या... तुम्ही प्रवास करत असलेल्या रेल्वेचे भाडे आजपासून महागले, किती वाढ झाली हे पाहण्यासाठी क्लिक करा

Ramdas Athawale : लाखोंची भीमशक्ती भाजपच्या पाठीशी; ‘रिपाइं’च्या संकल्प मेळाव्यास भीमसैनिकांची मोठी उपस्थिती

Gold Rate Today : सोन्याची घौडदौड सुरूच! भावात सलग पाचव्या दिवशी वाढ, चांदीही महागली; तुमच्या शहरात काय आहे आजचा ताजा भाव? जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी पहिल्या ३० उमदेवारांची यादी काँग्रेसकडून आज प्रसिद्ध होण्याची शक्यता

Gujarat Earthquake Today : पहाटे गुजरात हादरलं; कच्छ भागात भूकंपाचे धक्के, भूकंपशास्त्र विभागाची माहिती

SCROLL FOR NEXT