अकरावी प्रवेश Esakal
महाराष्ट्र बातम्या

शिक्षणाधिकाऱ्यांचे निर्देश! हमीपत्र, अर्जाच्या पोचवर द्या अकरावीसाठी प्रवेश; नॉन-क्रिमीलेअरची सक्ती नको

आता मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडील दाखल्यासाठी अर्ज केल्याची पोहोच पावती व हमीपत्र घ्या आणि तीन महिन्यात दाखला सादर करण्याची त्याला ३ महिन्यांची मुदत द्या, असे निर्देश माध्यमिक शिक्षणाधिकारी जावेद शेख यांनी महाविद्यालयांना दिले आहेत.

तात्या लांडगे

सोलापूर : मागासवर्गीय (ईडब्ल्यूएस) विद्यार्थ्यांना उत्पन्नाचा दाखला उशिरा मिळतोय आणि त्यामुळे नॉन-क्रिमीलेअरसाठी वेळ लागत आहे. त्यामुळे त्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून प्रवेश घ्यावा लागत आहे. प्रवेशावेळी नॉन-क्रिमीलेअर नसल्यास त्या प्रवर्गातून प्रवेश मिळणार नाही, अशी कनिष्ठ महाविद्यालयांची भूमिका आहे. या पार्श्वभूमीवर आता मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडील दाखल्यासाठी अर्ज केल्याची पोहोच पावती व हमीपत्र घ्या आणि तीन महिन्यात दाखला सादर करण्याची त्याला ३ महिन्यांची मुदत द्या, असे निर्देश माध्यमिक शिक्षणाधिकारी जावेद शेख यांनी महाविद्यालयांना दिले आहेत.

अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थी उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे (नॉन क्रिमीलेअर) प्रमाणपत्र सादर करण्यास आता सेतू सुविधा बंद असल्याने अडचणी येत आहेत. दाखला मिळण्याची मुदत ३० ते ४० दिवसांची आहे. त्यामुळे अनेक मागासवर्गीय विद्यार्थ्यांना दाखला नसल्याने खुल्या प्रवर्गातून प्रवेश घ्यावा लागला आहे.

अजूनही अनेकांवर तशी वेळ येणार आहे. त्यामुळे शालेय शिक्षण व क्रिडा विभागाने स्वतंत्र आदेश काढून सर्व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांना त्यासंदर्भात सूचना केल्या आहेत. त्यानुसार नॉन क्रिमीलेअरसाठी सक्ती न करता विद्यार्थ्यांना तीन महिन्यांची मुदत द्यावी, असे स्पष्टपणे नमूद केले आहे. शासनाचे आदेश निघाले, पण प्रत्यक्षात शाळांकडून त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी अधिकाऱ्यांनी त्यावर वॉच ठेवणे बंधनकारक आहे.

सहा महिने झाले, सेतू सुविधा बंदच

दहावी-बारावी निकालानंतर विद्यार्थी पुढील प्रवेशासाठी सेतू कार्यालयातून विविध प्रकारचे दाखले तातडीने काढून घेतात. पण, सेतू सुविधा केंद्रांची मुदत संपल्याने मागील सहा महिन्यांपूर्वी सेतू केंद्रांना कुलूप लागले आहे. प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी गावोगावी शासन आपल्या दारी उपक्रमाच्या माध्यमातून विशेष मोहीम घेऊन अनेकांना जागेवरच दाखले दिले. पण, अजूनही ४० ते ५० हजारांहून अधिक जण दाखल्यासाठी महा-ई-सेवा केंद्रांसमोरील रांगेत उभे आहेत. तरीदेखील जिल्हा प्रशासनाला सेतू सुविधा केंद्रे सुरु करता आलेली नाहीत. जुलैअखेरीस सेतू केंद्रे सुरु होतील, तोवर प्रवेश प्रक्रिया संपलेली असेल. १७ जुलैपासून अकरावीची महाविद्यालये सुरु होणार आहेत.

नॉन क्रिमीलेअरसाठी तीन महिन्यांची मुदत

मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्याने नॉन क्रिमीलेअरसाठी अर्ज केला आहे, पण तो दाखला मिळायला आणखी काही दिवसांचा वेळ असल्यास संबंधित शाळांनी त्या विद्यार्थ्यास त्याच्याच प्रवर्गातून इयत्ता अकरावीत प्रवेश द्यावा. तीन महिन्यांची मुदत देऊन त्याच्याकडून अर्जाची पोहूच व हमीपत्र घ्यावे आणि हा आदेश सर्व शाळा-महाविद्यालयांसाठी बंधनकारक आहे.

- जावेद शेख, माध्यमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: भावजयचे दिरासोबत अनैतिक संबंध, जाऊबाई संतापली, भर पंचायतीत ॲसिडची बाटली आणली अन्...; धक्कादायक कृत्य

Latest Marathi News Live Update : जैन मुनि नयपद सागर यांच्या ताराराणींबाबतच्या वक्तव्यावरून वाद वाढला

मोठे अपडेट्स : IPL मध्ये १० नव्हे १२ संघांमध्ये जेतेपदाची स्पर्धा रंगणार? BCCI चा मास्टर प्लान, शंभरच्या आसपास लढती होणार...

'दारु प्यायचो, मासांहार करायचो, दिवसाला 200 सिगारेट ओढायचो' अमिताभ बच्चन यांनी केलेला खुलासा, म्हणालेले...'इतकी दारू प्यायचो की...'

2011 World Cup India Team: २०११ फायलनच्या भारताच्या प्लेइंग इलेव्हनमधील हिरो आत्ता काय करतात, दोन खेळाडू अद्यापही IPL खेळतात

SCROLL FOR NEXT