महाराष्ट्र बातम्या

संशोधन संस्थांतील प्रवेश प्रक्रिया सुरू

जानेवारी आणि ऑगस्ट २०२३ च्या सत्राची घोषणा,

सकाळ डिजिटल टीम

पुणे: देशातील सर्वोच्च वैज्ञानिक संशोधन संस्थामध्ये पीएच.डी. बरोबरच पदव्युत्तर शिक्षण घ्यायची इच्छा असेल तर एक नामी संधी उपलब्ध झाली आहे. ॲकॅडमी ऑफ सायंटिफिक अॅन्ड इनोव्हेटिव्ह रिसर्च (एसीएसआयआर) या संस्थेच्या वतीने ऑगस्ट आणि जानेवारी २०२३ या दोन संत्रांची घोषणा केली आहे.

वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर), विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग (डीएसटी), भारतीय वैद्यक संशोधन संस्था (आयसीएमआर) आणि राष्ट्रीय महत्त्वाच्या संशोधन संस्थांमधील अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची प्रक्रिया एसीएसआयआरच्या माध्यमातून पार पडत आहे. विज्ञान आणि अभियांत्रिकीतील पीएच.डी. बरोबरच सार्वजनिक आरोग्यातील पदव्युत्तर शिक्षण, निवडक विषयातील एम.एससी. आणि एम.टेक.

त्याबरोबर दुहेरी पदवीसाठीही ही विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने २०१० मध्ये देशभरातील प्रयोगशाळा आणि संशोधन संस्थांतील अभ्यासक्रमांसाठी एसीएसआयआरची स्थापना केली. पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेसह देशभरातील ५३ संस्थांमधील प्रवेश या प्रक्रियेद्वारे होतात.

महत्त्वाच्या तारखा

सत्र ः प्रवेशाची अंतिम मुदत

जानेवारी २०२३ ः ३० सप्टेंबर २०२२

ऑगस्ट २०२३ ः २८ फेब्रुवारी २०२३

प्रवेशासाठी संकेतस्थळ ः https://acsir.res.in/

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAKISTAN SEMIS SCENARIOS : न्यूझीलंड हरला, म्हणून पाकड्यांनी जास्त फडफडू नये! उपांत्य फेरीचं समीकरण पाहताच येईल चक्कर...

T20 WC, NZ vs ENG : इंग्लंडने बाजी मारली, पाकिस्तानच्या जीवात जीव आला! न्यूझीलंड पराभूत होऊनही पोहचू शकतात उपांत्य फेरीत

Reliance Group: अंबानींच्या सून राधिका मर्चंट पैठणमध्ये! तीन महिन्यात दुसरा दौरा; पोलिस बंदोबस्तात प्रकल्पाला दिली भेट

Accident : सिंदखेड फाट्यावर दुचाकी चारचाकीची भीषण धडक; एक महिला ठार, एक जखमी

Mount Abu Name Change : जगप्रसिद्ध 'माउंट अबू'सह तीन शहरांचे नामांतर; मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT