Eknath Shinde vs Uddhav Thackeray  Sakal Digital
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंची सत्ता राहाणार की जाणार? सत्तासंघर्षावर कायदेतज्ज्ञांनी वर्तवल्या 'या' शक्यता

रोहित कणसे

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या सुनावणी पूर्ण झाली झाली असून सुप्रीम कोर्टाने निर्णय राखून ठेवला आहे. तब्बल 9 महिन्यांच्या युक्तिवादानंतर महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा फैसला काय येणार? याकडे देशाचे लक्ष लागून राहिले आहे. यादरम्यान राज्यातील सत्तासंघर्षावर लवकरच म्हणजेच ११ मे किंवा १२ मे २०२३ रोजी निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान या सत्तासंघर्षाच्या निकालाबाबत कायदेतज्ज्ञ ॲड. असीम सरोदे यांनी काही शक्यता वर्तवल्या आहेत. त्यांनी ट्वीट करत महाराष्ट्रसत्तासंघर्ष प्रकरणी निकाल ११ किंवा १२ मे २०२३ लागेल. तसेच निकालात काय निर्णय होईल याबद्दल काही शक्यता बोलून दाखवल्या आहेत.

ॲड. असीम सरोदे यांनी निकाल काय असेल याबाबत केवळ काही कायदेशीर शक्यता व्यक्त करता येऊ शकतात असं म्हटलं आहे.

शक्यता काय आहेत?

1.आमदार अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे पाठवणे ही एक मोठी शक्यता सोप्या निर्णयाचा भाग म्हणून जास्त आहे.

2. गव्हर्नर भगत कोशियारी यांनी जो आदेश काढून फ्लोअर टेस्ट घ्या, विधानसभेत बहुमत सिद्ध करा असा आदेश काढला तो काढण्याचा त्यांना अधिकारच नव्हता. राज्यपालांनी बहुमतचाचणीचा दिलेला आदेश रद्द ठरवला जाऊ शकतो.

शक्यता 3. पक्षविरोधी कारवाया केल्या असे म्हणून 16 आमदारांना थेट स्वतःच अपात्र ठरविण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालय घटनेतील कलम 142 चा वापर करून घेईल कारण बहुमत चाचणी आदेश ही राज्यपालांची कृतीच घटनाबाह्य असल्याने ती रद्द करण्याचे अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहेत.

शक्यता 4. एक धूसर व कदाचित अस्पष्ट शक्यता आहे की हे प्रकरण मोठ्या संविधानिक गुंतागुंतीचे आहे व त्यामुळे 10 व्या परिशिष्टा संदर्भात आधी झालेल्या निर्णयांचा संदर्भ घेऊन हे प्रकरण 7 न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे पाठवले जाऊ शकते. ही शक्यता धूसर आहे व तसे होणार नाही असे वाटते.

शरद पवार काय म्हणालेत?

सर्वोच्च न्यायालयाचा महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत निकाल कधी येणार? यासंदर्भात शरद पवार यांनी निकाल कधी लागेल हे सांगता येणार नाही. पण निकाल लवकर लागण्याची शक्यता आहे, असं सूचक विधान केलं. कारण घटनापीठातील काही न्यायमूर्ती निवृत्त होत आहेत. त्यामुळे निकाल लवकर लागेल. बघुया काय होतयं. अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT