Fadanvis on Pravin Chavan Sakal
महाराष्ट्र बातम्या

प्रवीण चव्हाण यांचा राजीनामा; म्हणाले, तेजस मोरेने सुपारी घेऊन..

चोर कितीही हुशार असला तरी काही ना काही ठेऊन जातो असेही चव्हाण म्हणाले.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnvis) आरोपानंतर विशेष सरकारी वकील प्रविण चव्हाण (Pravin Chavan) यांचा राजीनामा घेण्यात आला आहे. या सगळ्या प्रकरणातून आपल्याला बाजूला होयचं असं वाटल्याने स्वतःहून राजीनामा देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच आपण कोणालाही भेटलो नसून माझं कुठलंही राजकीय संबंध नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात सादर केलेले स्टिंग ऑपरेशनचे हे तेजस मोरेने सुपारी घेऊन केल्याचा आरोप चव्हाण यांनी केला असून, यातील खरं नेमकं काय हे तपासातून समोर येईल असे ते म्हणाले.

तेजस मोरेचे सगळे पुरावे आपल्याकडे असून, त्याने मला अनेक वेळा ए सी, स्मार्ट टीव्ही लावायचे हट्ट धरले होते असे चव्हाण यांनी म्हटले असून, तेजस मोरेला आपण येऊ नको असे वारंवार सांगत होतो. परंतु, आपल्याला पसवण्याचा त्याचा उद्धस असल्याने तो वारंवार माझ्याकडे येत असल्याचेही चव्हाण म्हणाले. एवढेच काय तर, माझ्या ऑफिसमधून मोबाईल, लॅपटॉप बॅग चोरीला गेल्याचे सांगत मोरे आठवड्यातून दोन ते तीन वेळा कार्यालयात येत असत असे ते म्हणाले.

रायसोनी आरोपी नाही केस कशी घेणार

दरम्यान, रायसोनी हे कुठलेही आरोपी नाही मग आपण त्यांची केस का घेऊ असा प्रश्न चव्हाण यांनी उपस्थित करत या प्रकरणात आपण कधीच वकीलपत्र घेतलं नसल्याचे चव्हाण म्हणाले. करोड रुपयांची जमीन गिरीश महाजन आणि साधना महाजन यांनी त्यांच्या नावे केल्याचाही आरोप चव्हाण यांनी यावेळी केला. फडणवीस यांनी फॉरेन्सिक ऑडिट करण्याची घाई का केली असा सवाल उपस्थित करत आपण या सर्व प्रकरणात कायदेशीर कारवाई करणार असल्याचे ते म्हणाले. तसेच हे षडयंत्र कोणी रचलं हे चौकशीमध्ये समोर येईल. चोर कितीही हुशार असला तरी काही ना काही ठेऊन जातो असेही चव्हाण म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Vastu Shastra: झाडू ठेवण्याचीही असते योग्य दिशा? वास्तुशास्त्रातील ‘हा’ नियम जाणून घ्या

Raksha Bandhan 2026: पीरियड्समध्ये भावाला राखी बांधता येते का? जाणून घ्या सत्य काय अन् परंपरा काय

Latest Marathi News Live Update : मुंबईत कंत्राटदाराचा सातवा बळी, सरकारची ८६ हजार कोटींची थकबाकी

मोठा अनर्थ टळला... जुई गडकरीच्या विमानात बिघाड? कॅप्टनने वाचवलं, अभिनेत्रीच्या पोस्टने चाहते चिंतेत

SCROLL FOR NEXT