Aerial maharashtra .jpeg 
महाराष्ट्र बातम्या

सकाळच्या माध्यमातून अनुभवता येणार गडकिल्ल्यांची हवाई सफर

रफिक पठाण

पुणे: लॉकडाऊन काळात आपल्याला कोठेही फिरायला जाता येत नाहीये. नैसर्गिक समृद्धीने नटलेल्या महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांच्या भेटीचा आनंद आपल्याला घेता यावा यासाठी सकाळ माध्यम समूहाच्या वतीने 6 जून म्हणजेच शिव राज्याभिषेक दिनापासून प्रत्येक शनिवारी एका नवीन  गडकिल्ल्याची हवाई सफर आपल्याला करता यावी यासाठी एरियल महाराष्ट्र: सफर गडकिल्ल्यांची हा कार्यक्रम प्रदर्शित केला जाणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक शनिवारी आपल्याला महाराष्ट्रातील किल्ले पाहता येणार आहेत. 

काय असेल खास:
आपल्यातील प्रत्येक जण छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांच्या प्रेमात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पश्चिम घाटातील गडकिल्ल्यांना आपण भेट देतच असतो. त्या गडकिल्ल्यांचे ड्रोनद्वारे केलेले सुंदर हवाई चित्रीकरण या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचा अनुभव प्रत्येकाला घेता यावा यासाठी हा कार्यक्रम प्रदर्शित केला जाणार आहे. ट्रेकिंग करता संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले कलावंतीण दुर्ग, बागलाण रेंज, गोरखगड, तोरणा इत्यादी किल्ल्यांची हवाई सफर आपल्याला अनुभवता येणार आहे. 

भूगोल आणि इतिहासाची उत्तम सांगड अनुभवायची संधी:
महाराष्ट्रातील प्रत्येक गड किल्ले हे आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासाचे साक्षीदार आहेत. महाराष्ट्रातील याच किल्ल्यांचा इतिहास आणि भौगोलिक रचना आपल्याला या कार्यक्रमात अनुभवता येणार आहे. प्रत्येक किल्ल्याचे भौगोलिक स्थिती, नैसर्गिक रचना आणि त्याचा असलेला इतिहास आपल्यापर्यंत या कार्यक्रमातून पोहचवला जाणार आहे. 

पाहा व्हिडिओ:


 
ट्रेकर्स मंडळींचा पुढाकार:
महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचा इतिहास प्रत्येकापर्यंत अनोख्या पद्धतीने पोहचवण्यासाठी ट्रेकर्स मंडळींच्या पुढाकाराने हा कार्यक्रम सुरु करण्यात येणार आहे. ट्रेकर मनोज म्हस्के यांच्या अतिशय सुंदर अश्या चित्रीकरणाच्या माध्यमातून आपल्याला हि हवाई सफर घडणार असून या कार्यक्रमाची संपूर्ण निर्मिती सकाळ माध्यम समूहाच्या रफिक पठाण यांच्याद्वारे करण्यात येणार आहे.

आपल्या महाराष्ट्राच्या हा इतिहास सर्वांपर्यंत पोहचण्यासाठी प्रत्येक शनिवारी नक्की व्हिडीओ पाहा आणि इतरांसोबत शेयर करा.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील ३६,२११ कंपन्या बंद झाल्या? चर्चेवर देवेंद्र फडणवीसांचा खुलासा; शरद पवारांना सांगितलं सत्य

FDA Crime : पुण्यातील बर्गर किंगवर एफडीएची कारवाई; अकरा हॉटेलचे परवाने निलंबित

''भारत शांततेवर विश्वास ठेवतो, पण...''; स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती मुर्मूंचं देशवासीयांना संबोधन

Marathi News Live Updates : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मोठी घोषणा, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पणतू स्थापन करणार नवा राजकीय पक्ष

Manchar News : ग्रामीण भागातील रुग्णांना मोठा दिलासा! मंचरला ‘टॉपकॉन ट्रायटन’ मशीनद्वारे रेटिना व सूक्ष्म रक्तवाहिन्यांचे अचूक पद्धतीने होणार परीक्षण

SCROLL FOR NEXT