One Nation One Election Esakal
महाराष्ट्र बातम्या

One Nation One Election: इंडियाच्या बैठकीला घाबरून 'एक देश एक निवडणूक' प्रयत्न सुरू; वड्डेटीवार यांची टीका

इंडिया आघाडीच्या या बैठकीमुळे केंद्र सरकारचा 'एक देश एक निवडणूक' प्रयत्न सुरू असल्याची टीका

अंकिता खाणे (Ankita Khane)

'एक देश एक निवडणुक' संदर्भात मोठे पाऊल उचलत केंद्र सरकारने माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आहे. ही समिती कायद्यातील सर्व बाबींचा विचार करेल. पीटीआय वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने यासंबधीची माहिती दिली आहे. एक देश एक निवडणूक घेता येईल का या बाबींचा अभ्यास करण्यासाठी या महत्वाच्या समितीची स्थापना करण्यात आली आहे. यावर राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी हल्लाबोल केला आहे.

यावेळी बोलताना विजय वड्डेटीवार म्हणाले की, इंडिया आघाडीच्या या बैठकीमुळे केंद्रातील सरकार विचलीत झाली आहे. एक देश एक निवडणुकसाठी १२ राज्यातील मुख्यमंत्री विरोधक आहेत. अशा स्थितीत मोठा आकडा गाठणं भाजपला कठिण आहे. तर माजी राष्ट्रपतींच्या अध्यक्षतेखालील जी समिती आहे, त्या समितीला काम करण्यासाठी किमान ३ महिन्यांपेक्षा आधिक कालावधी लागेल. तोपर्यंत डिसेंबर उजाडेल. तर या १२ राज्यातील मुख्यमंत्र्याच्या सहमतीशिवाय त्या राज्यातील विधानसभेच्या ठरावाशिवाय संविधानामध्ये बदल करायचा असेल तर एक तृतांश आकडा आता भाजपकडे आहे का येथून प्रश्न निर्माण होईल असं विजय वड्डेटीवार यांनी म्हटलं आहे.

तर काल राहुल गांधी यांनी अदाणी समुहावर केलेल्या आरोपांना बगल देण्यासाठी हे सर्व प्रयत्न सुरू आहेत. त्या विषयाचे महत्त्व कमी करण्यासाठी हा प्रयत्न सुरू आहेत. विरोधकांची एकजूट आणि या एकत्रित येण्याला ते घाबरले आहेत. म्हणून गॅस, पेट्रोलचे दर कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. येत्या काही दिवसांमध्ये डिझेल ६० रूपयांवर येण्याची शक्यता आहे. विरोधकांना, आणि पराभवाला घाबरून हे सर्व प्रयोग सुरू असल्याचंही विजय वड्डेटीवार यांनी म्हटलं आहे.

त्याचबरोबर एक देश एक निवडणुकसाठी विरोधकांनाही विश्वासात घेणे गरजेचे आहे. कारण देशातील १२ राज्यांमध्ये विरोधक मुख्यमंत्री आहेत. तर ६ राज्यांचे मुख्यमंत्री हे तटस्थ आहेत. अशा स्थितीत लागणारे बहुमत लागतं, ते भाजपकडे आहे का हा प्रश्नही आहे असंही ते पुढे म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP नेत्यांचा मोठा विजय! आंदोलनाला वेग; अखेर अभिजीत दिपके यांच्यासह तिघांची सुटका, आता सर्वोच्च न्यायालयात काय घडणार?

Navratri 2026 Wishes in Marathi: 'उदे ग अंबे उदे'... नवरात्रीनिमित्त व्हॉट्सॲपवर शेअर करा देवी दुर्गेच्या आशीर्वादाचे हे सुंदर शुभेच्छा संदेश

Maharashtra Live News :सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या मतदानाला सुरुवात...

IND vs WI 3rd T20: इंदूरमध्येही आज बॅट विरुद्ध बॅट? दुसऱ्या सामन्यात ५०१ धावांचा पाऊस, आता तिसऱ्या टी-२०मध्येही फलंदाजांचे वर्चस्व राहणार?

Madhya Pradesh: अकराशे विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मोफत चष्मे वाटप; टीबी रुग्णांना ८ किलोची पोषण आहाराची टोपली

SCROLL FOR NEXT