New Education Policy esakal
महाराष्ट्र बातम्या

बारावीनंतर ४ वर्षांत घेता येणार २ पदव्या; नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात ‘एन्ट्री व एक्झिट’चा पर्याय

आयुष्यभर एकाच विषयातून शिकला, पण नोकरी मिळाली नाही असे लाखो बेरोजगार तरुण आहेत. त्यातील अनेकजण नैराश्याचे शिकार देखील झाले. पण, आता नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातून विद्यार्थ्यांना बारावीनंतर चार वर्षांत एकाचवेळी दोन पदव्या घेण्याची सुवर्णसंधी असणार आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : आयुष्यभर एकाच विषयातून शिकला, पण नोकरी मिळाली नाही असे लाखो बेरोजगार तरुण आहेत. त्यातील अनेकजण नैराश्याचे शिकार देखील झाले. पण, आता नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातून विद्यार्थ्यांना बारावीनंतर चार वर्षांत एकाचवेळी दोन पदव्या घेण्याची सुवर्णसंधी असणार आहे.

पारंपारिक शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल करून आता नवीन धोरणात विद्यार्थ्यांच्या कल व आवडीचा विचार करण्यात आला आहे. बारावीनंतर कला, विज्ञान व वाणिज्य शाखेतून उच्च शिक्षण घेऊन इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना आवडीचे विषय घेऊन शिक्षण पूर्ण करता येणार आहे. पदवीचे शिक्षण घेताना त्याला कौशल्य विकासाचा कोर्स देखील करता येणार आहे. त्याचे क्रेडिट्‌स त्याला मिळतील आणि पुढील शिक्षणासाठी फायदा होईल. २०२३-२४ या शैक्षणिक वर्षातून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी राज्यातील सर्वच अकृषिक विद्यापीठात केली जाणार आहे. बारावीनंतर पदवीला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना ‘एन्ट्री व एक्झिट’ असे दोन पर्याय देण्यात आले आहेत.

पहिल्या वर्षानंतर बाहेर पडायचे असल्यास ‘एक्झिट’ पर्याय निवडायचा आणि त्याला एक वर्षाचे प्रमाणपत्र मिळेल. दुसऱ्या वर्षी बाहेर पडल्यास डिप्लोमाचे तर तिसऱ्या वर्षी बाहेर पडल्यास पदवी प्रमाणपत्र मिळेल. पण, चौथ्या वर्षानंतर त्याला एका विषयात मेजर्स किंवा रिसर्च करण्याची संधी मिळेल. रिसर्च निवडल्यास पीएच.डी करता येईल. विशेष बाब म्हणजे चार वर्षाच्या काळात तो कधीही दुसऱ्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकणार आहे. शेवटच्या वर्षी सहा महिने आवडीच्या कौशल्य तथा व्यवसायाबद्दल प्रशिक्षण देखील मिळणार आहे.

ऑनलाइन, ऑफलाइन शिकण्याची संधी

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत एका विद्यार्थ्यास चार वर्षांत दोन अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येणार आहे. पण, दोन्ही अभ्यासक्रमाचा वेळ एकच नसावा. रात्र व नियमित महाविद्यालयात विद्यार्थ्यांना त्यापद्धतीने शिकता येणार आहे. दुसरीकडे एक अभ्यासक्रम ऑनलाइन तर दुसरा ऑफलाइन असेल, तरीदेखील दोन पदव्या पूर्ण करता येणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांना दोन्ही अभ्यासक्रम झेपतील, त्यांच्यासाठी निश्चितपणे ही सुवर्णसंधी असणार आहे.

एकाचवेळी मिळतील दोन पदव्यांची संधी

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांमधील कौशल्य, कल, आवडीचा विचार केला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना दोन वेगवेगळ्या विषयातून पदवीचे शिक्षण पूर्ण करता येणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने यापूर्वीच विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून कौशल्य विकासाचे कोर्सेस सुरु केले असून आता नवीन धोरणात त्यालाच प्राधान्य दिले आहे.

- डॉ. मृणालिनी फडणवीस, कुलगुरू, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT