Maharashtra Politics Esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics: 4 जूननंतर पुन्हा खेला होबे? शरद पवार गट, ठाकरेंचा गट फुटणार असल्याचा भाजप नेत्याचा दावा

Maharashtra Politics: कंबोज यांनी सोशल मिडीया एक्सवरती पोस्ट शेअर करत राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भूंकप होणार असल्याचं भाकित वर्तवलं आहे. त्यांच्या या पोस्टनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्यासह देशभरात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच अनेक नेते आरोप प्रत्यारोप करत असतानाच भाजप नेत्याने मोठं वक्तव्य केलं आहे. भाजप नेते मोहित कंबोज यांनी मोठं वक्तव्य करत राजकारणात खळबळ उडवली आहे. कंबोज यांनी सोशल मिडीया एक्सवरती पोस्ट शेअर करत राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भूंकप होणार असल्याचं भाकित वर्तवलं आहे. त्यांच्या या पोस्टनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

कंबोज यांची पोस्ट काय आहे?

मोहित कंबोज यांनी आपल्या सोशल मिडीया एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे की, लोकसभेचा निकाल 4 जून रोजी जाहीर झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राष्ट्रवादी शरद पवार गटात आणखी फूट पडेल. दोन्ही पक्षांतील आमदार, नेते आणि कार्यकर्ते राजीनामा देऊन बाहेर पडतील. या पक्षांतील सर्वजण इतर पक्षांच्या संपर्कात आहेत, असा दावा देखील मोहित कंबोज यांनी केला आहे.

कंबोज यांच्या या दाव्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ठाकरे गट आणि शरद पवार गटातील उर्वरित आमदार उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची साथ सोडून सत्ताधारी पक्षांमध्ये सामील होणार का याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

५ तारखेला भाजप फुटेल असा उध्दव ठाकरेंचा दावा

नाशिकच्या सभेत बोलताना उध्दव ठाकरे यांनी 5 तारखेला अर्धा भाजप पक्ष फुटल्याशिवाय राहणार नाही. हे तुम्ही सगळे गद्दार जमवले आहेत, सत्ता आल्यावर सगळी यंत्रणा आमच्या हातात असेल, मग आम्ही या गद्दारांच्या शेपट्या कशा पकडतो, बघा तुम्ही, असा हल्लाबोल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नवले पुलाजवळ भीषण अपघात; ब्रेक फेल झालेल्या कंटेनरची वाहनांना धडक, दोघांचा मृत्यू

Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण १७ वर्षे रखडले; खर्चात तब्बल ५५०० कोटींची वाढ, कोकणवासीयांचा संताप उफाळला

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT