solapur airport sakal
महाराष्ट्र बातम्या

8 वर्षानंतर केंद्र सरकारच्या ‘उडान’ला मुहूर्त! सोलापूर विमानतळावरून उडणार 40 अन्‌ 70 सीटर विमाने; विमानतळाचा रन-वे 2009 मीटर; नाईड लॅण्डिंग सध्या नाही

‘डीजीसीए’ आणि ‘बिकास’ या दोन्ही यंत्रणांच्या परवानगीनंतर आता सोलापूरचे होटगी रोड विमानतळ विमानसेवेसाठी सज्ज झाले आहे. आता अंतिम मंजुरी मिळून मार्ग व विमान कंपन्या निश्चित झाल्यानंतर येथून एटीआर ही ४० व ७० सीटर विमाने उड्डाण करतील. मोठी विमाने उड्डाण करतील.

तात्या लांडगे

सोलापूर : ‘डीजीसीए’ (नागर विमानन महानिदेशालय) आणि ‘बिकास’ (ब्यूरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी) या दोन्ही यंत्रणांच्या परवानगीनंतर आता सोलापूरचे होटगी रोड विमानतळ विमानसेवेसाठी सज्ज झाले आहे. आता अंतिम मंजुरी मिळून मार्ग व विमान कंपन्या निश्चित झाल्यानंतर येथून एटीआर ही ४० व ७० सीटर विमाने उड्डाण करतील. मोठी विमाने उड्डाण करतील, एवढा रन-वे नसल्याची माहिती विमानतळ प्रशासनाने दिली.

सोलापूरच्या होटगी रोड विमानतळासाठी प्रमुख अडथळा ठरणारी श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याची ९२ मीटर चिमणी १५ जूनला पाडण्यात आली. त्यानंतर दोन महिन्यात विमानसेवा सुरू होईल, असे सांगण्यात आले. मात्र, वर्ष होऊनही विमानसेवा सुरू झाली नाही. त्यावर सातत्याने टीका झाली आणि विमानसेवा सुरू करण्याच्या हालचाली गतीमान झाल्या. रन-वे, संरक्षक भिंत, पिण्याच्या पाण्याची सोय, ड्रेनेज अशी कामे तातडीने निविदा काढून पूर्ण करण्यात आली. त्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सतत पाठपुरावा केला. दोन हजार नऊ मीटर लांबीचा रन-वे असून त्यावरूनच विमान उतरणार आणि उड्डाण देखील करणार आहे.

केंद्र सरकारच्या १५ जून २०१६ च्या ‘उडान’ योजनेतून सोलापूरची विमानसेवा तब्बल आठ वर्षांनी सुरू होत आहे. देशातील सामान्य लोकांनाही माफक दरात विमानातून प्रवास करता यावा हा त्या योजनेचा उद्देश आहे. सोलापूरची विमानसेवा आता दोन महिन्यात सुरू होईल. तुर्तास विमान कंपन्या व पहिल्यांदा कोणते मार्ग असतील, यासंदर्भात वरिष्ठ स्तरावरून बोलणी सुरू असल्याची माहिती होटगी रोड विमानतळाचे व्यवस्थापक बानोत चाम्पला यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली. सुरवातीला सोलापूर ते मुंबई, हैदराबाद, गोवा या मार्गावर विमानसेवा सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत.

नाईड लॅण्डिंग सध्या तरी नाही

होटगी रोड विमानतळावरून पहिल्या टप्प्यात दिवसा विमानसेवा सुरू होणार आहे. विमानसेवेचा प्रतिसाद, प्रवासी पाहून नाईट लॅण्डिंगची सोय केली जाणार आहे. तत्पूर्वी, विमान कंपन्या, मार्ग निश्चित होणे जरूरी असून केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या माध्यमातून त्यासंदर्भात युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

विमानतळ उड्डाणासाठी सज्ज

‘डीजीसीए’ व ‘बिकास’कडून होटगी रोड विमानतळाची अंतिम पाहणी झाली असून आता विमानतळ विमानसेवेसाठी सज्ज आहे. विमानतळाचा रन-वे दोन हजार नऊ मीटर असून येथून एटीआर ४० व ७० सीटर विमाने उडू शकणार आहेत.

- बानोत चाम्पला, व्यवस्थापक, होटगी रोड विमानतळ, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray and Uddhav Thackeray: राज-उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र मैदानात; ४ ऑक्टोबरला मुंबईत मोर्चा, हातात फक्त तिरंगा!

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर ट्रॅफिक जाम! टेम्पो पलटी झाल्याने वाहनांच्या रांगाच रांगा, 4-5 तासांपासून भीषण कोंडी

Revanth Reddy Remarks : ‘महादेव गरिबांचे, राम श्रीमंतांचे’ रेवंत रेड्डींच्या वक्तव्याने राजकीय वातावरण तापले; भाजप आक्रमक

Marathi News Live Updates: अंगारकी चतुर्थीनिमित्त मोरगावच्या मयुरेश्वराच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची मोठी गर्दी, मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण

World Heart Day 2026: कार्डिओफोबिया म्हणजे काय? लक्षणे, कारणे आणि उपचार याबद्दल संपूर्ण माहिती एकाच क्लिकवर!

SCROLL FOR NEXT