Anil Deshmukh_Hrishikesh Deshmukh 
महाराष्ट्र बातम्या

हृषिकेश देशमुख यांच्याही वाढणार अडचणी? अटकपूर्व जामीन लांबला!

अनिल देशमुख यांना कोर्टानं १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची ईडीची कोठडी संपल्यानंतर १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, त्यांचा मुलगा हृषिकेश देशमुख यांच्याही अडणी वाढल्या आहेत. मुंबई सत्र न्यायालयानं आर्थिक घोटाळाप्रकरणी त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली आहे. त्यानुसार, ही सुनावणी १२ नोव्हेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे त्यांना अटकेपासून कोणताही अंतरिम दिलासा मिळालेला नाही.

हृषिकेश देशमुख हे आज सत्र न्यायालयात पोहोचले आणि त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला. दरम्यान, गुरुवारी ईडीनं त्यांना आर्थिक घोटाळाप्रकरणी चौकशीसाठी समन्स बजावलं होतं. याच प्रकरणात सध्या त्यांचे वडील अनिल देशमुख अटकेत आहेत. ईडीनं हृषिकेश यांना शुक्रवारी हजर राहण्याचे आदेश दिले होते, पण ते हजर झाले नाहीत. दरम्यान, त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात धाव घेतली.

दरम्यान, अनिल देशमुख यांना १०० कोटी रुपयांच्या खंडणी आणि आर्थिक घोटाळाप्रकरणी सोमवारी ईडीनं अटक केली होती. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी त्यांच्यावर हे आरोप केले होते. अनेक गैरव्यवहारांमध्ये अनिल देशमुख यांचा हात होता, बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याच्यामार्फत मुंबईतील बार आणि रेस्तराँमधून ही १०० कोटींची वसुली करण्यास सांगितली होती, असा आरोपही परमबीर सिंग यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नव्या मतदार नोंदणीसाठी महत्त्वाची बातमी! आता नोंदणीवेळी जुळवावी लागणार २४ वर्षांपूर्वीची वंशावळ; प्रशासनाला शोध सोलापुरातील ६ लाख मतदारांचा, वाचा...

Riddhi Thakkar: ‘लेट्स एक्सप्लोर बस्तर...’ २० बाइकरचा ग्रुप, सफरीचं स्वप्न ठरलं अखेरचं, अचानक काळाचा घाला; मुंबईच्या रिद्धीचा दुर्दैवी अंत

Khutbav Accident : नियतीचा खेळ, मृत्यूतही साधला मेळ; रक्षाबंधनापूर्वी बहीण-भावावर काळाचा घाला, पारगावात हळहळ

Talegaon Dabhade News : रस्ता नसल्याने ज्येष्ठाला उपचारासाठी झोळीतून नेण्याची वेळ

मोठी बातमी! मराठा समाजातील १.८१ लाख तरुण रोजगार मागणारे नव्हे रोजगार देणारे; ७ वर्षांत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून १८७४ कोटी

SCROLL FOR NEXT