Ahmednagar  Esakal
महाराष्ट्र बातम्या

Ahmednagar : औरंगाबाद आणि उस्मानाबादनंतर आता अहमदनगरचेही नाव बदलणार? भाजप नेत्याचं सूचक वक्तव्य

औरंगाबाद आणि उस्मानाबादनंतर आता अहमदनगरचेही नाव बदलणार असल्याच्या चर्चा

सकाळ डिजिटल टीम

केंद्र सरकारने काल (शुक्रवारी) औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामांतराला मंजुरी दिली. त्यामुळे लवकरच औरंगाबादचं नाव आता छत्रपती संभाजीनगर झालं आहे तर उस्मानाबादचं नाव धाराशिव झालं आहे. औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतरानंतर आता अहमदनगरच्या नामांतराबाबत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ट्विट करत सूचक वक्तव्य केलं आहे.

छत्रपती संभाजी नगर आणि धाराशिवनंतर आता अहमदनगरच्या नामकरण करण्यासाठी भाजप गोटात सुरू हालचाली सुरू झाल्या आहेत. अहमदनगरचे नामांतर ‘अहिल्यानगर’ देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वाखाली होणार, असं ट्विट भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे. पडळकर यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

पडळकर यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, "औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नामांतर धाराशीव केल्याबद्दल शिंदे-फडणवीस सरकारचे आभार व अभिनंदन.त्याचप्रमाणे पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे जन्मस्थान असलेल्या अहमदनगरचे नामांतर ‘अहिल्यानगर’ मा. देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वात होणारच असं ट्विट केलं आहे.

दरम्यान, पडळकर यांनी याआधीही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे अहमदनगरचे नामांतर ‘अहिल्यानगर' असे करा, अशी मागणी केली होती. त्यांनी पत्र लिहून तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT