Amruta Fadnavis blackmailing
Amruta Fadnavis blackmailing  Esakal
महाराष्ट्र

Amruta Fadnavis: दाराला कुलूप, पोलिसांची नोटीस, जेलमधून सुटल्यावर अनिक्षा जयसिंघानी गेली कुठे?

सकाळ डिजिटल टीम

अमृता फडणवीस यांच्या ब्लॅकमेलिंग प्रकरणातील महत्त्वाची आरोपी अनिक्षा जयसिंघानी नेमकी कुठे गेली आहे, यावरून आता चर्चा सुरु झाली आहे. अनिक्षा जयसिंघानी आणि तिचे वडील अनिल जयसिंघानी यांना सोमवारी कोर्टासमोर हजर करण्यात आलं होतं. अनिक्षा हिला जामीन मंजूर करण्यात आला तर अनिल जयसिंघानी याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती.

त्यानंतर मंगळवारी अनिक्षा हिची भायखळा जेलमधून सुटका झाली. मात्र जेलमधून सुटल्यावर अनिक्षा जयसिंघानी उल्हासनगर येथील तिच्या घरी गेली नसल्याचं आढळून आलं आहे. उल्हासनगर येथील तिच्या घराला कुलूप असल्याचं दिसून आलं आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना १ कोटी रुपयांची लाच देणे आणि ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रयत्न अनिक्षा जयसिंघानी आणि तिचे वडील अनिल जयसिंघानी यांनी केल्याचा आरोप आहे. १६ मार्च रोजी अनिक्षा जयसिंघानीला या प्रकरणात क्राइम ब्रांच पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर अनिल जयसिंघानी याला गुजरातमधून अटक करण्यात आली होती.

या गुन्ह्यामध्ये अनिल जयसिंघानी प्रमुख आरोपी असल्याचा युक्तिवाद कोर्टासमोर करण्यात आला. माध्यमांपासून लपण्यासाठी अनिक्षाने घरी येणं टाळलं असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

अनिल जयसिंघानी याचा जामीन अर्ज मंगळवारी फेटाळण्यात आला आहे. मंगळवारी अनिक्षा जयसिंघानी हिची भायखळा जेलमधून सुटका करण्यात आली. त्यानंतर अनिक्षा डीबी मार्ग पोलीस ठाण्यातून रवाना झाली. मात्र तिला ज्या घरातून अटक करण्यात आली होती, त्या उल्हासनगरच्या घरी ती आलेलीच नाही. या घराला कुलूप लागलेलं असून दारावर अनिल जयसिंघानीच्या नावाने पोलिसांची नोटीस लावलेली आहे. अनिक्षा माध्यमांचा ससेमिरा चुकवण्यासाठी अज्ञातस्थळी रवाना झाल्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 phase 4 Election Voting LIVE : लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात; मोठ्या संख्येने नागरिक हजर

Sushma Andhare : "मिस्टर राज, तुम्हाला माझ्या नावाची सुपारी..." सुषमा अंधारे यांचा लाव रे तो व्हिडीओवरून हल्लाबोल

Raj Thackeray : राज ठाकरेंचा पुन्हा एकदा 'लाव रे तो व्हिडीओ', सुषमा अंधारेंचा जुना व्हिडीओ दाखवून उद्धव ठाकरेंना सवाल

Ravindra Dhangekar : भाजपकडून पुण्यात पैसे वाटल्याचा आरोप, काँग्रेस उमेदवार धंगेकरांचं पोलिस ठाण्यात धरणे आंदोलन

Loksabha election : निवडणूक किस्सा! अमिताभ बच्चन उमेदवार अन् लिपस्टिकच्या खुणा असलेल्या चार हजार मतपत्रिका...

SCROLL FOR NEXT