Nawab Malik-Devendra Fadnavis google
महाराष्ट्र बातम्या

'दिवाळीनंतर बॉम्ब मी फोडेन', फडणवीसांचा नवाब मलिक यांना इशारा

"नवाब मलिक यांनी दिवाळीच्या सुरुवातीला लंवगी-फटाका लावला"

दीनानाथ परब

मुंबई: माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांचे ड्रग्स पेडलरसोबत (Drug peddlar) संबंध असल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (Ncp) आणि प्रवक्ते नवाब मलिक (Nawab malik) यांनी केला. त्याला आता देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. "नवाब मलिक यांनी दिवाळीच्या दिवशी लंवगी-फटाका लावला आहे. लक्षात ठेवा नवाब मलिक दिवाळी झाल्यावर बॉम्ब मी फोडेन" असा थेट इशाराच देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

"मी काचेच्या घरात राहत नाही. ज्यांचे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत, अशा लोकांनी माझ्याशी, ड्रग्ज संदर्भात बोलू नये" असे फडणवीस म्हणाले. "सगळे पुरावे आपल्यासमोर मांडेन. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना नवाब मलिकांचे अंडरवर्ल्डशी असलेल्या सगळ्या संबंधाचे पुरावे देईन. त्यामुळे दिवाळी संपण्याची वाट बघा, त्यांनी सुरुवात केली आहे, याला अंतापर्यंत न्यावच लागेल" असे फडणवीस म्हणाले.

"या सगळ्यामध्ये नवाब मलिक यांना आपल्या जावयाचे आरोपपत्र कमकुवत करायचे आहे. NCB अधिकाऱ्यांवर दबाव आणून, या सगळ्यातून सुटण्यासाठी मदत करावी, यासाठी हे सर्व सुरु आहे. पण कायदा सक्षम आहे" असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर ! 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट, जाणून घ्या आज तुमच्या भागात कसे असेल हवामान?

ढिंग टांग : ‘हम्म्मऽऽ’...चा हुंकार!

मानसवेध : तमसो मा ज्योतिर्गमय

विशेष : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भविष्यातील निर्णय

Poha-Rava-Curd Pancake: पोहे नेहमीच बनवता? एकदा करून पाहा पोहे-रवा दही पॅनकेक; चवीला कुरकुरीत, आतून मऊ!

SCROLL FOR NEXT