Devendra Fadanvis and Raj Thackeray esakal
महाराष्ट्र बातम्या

Raj Thackeray : काहीतरी शिजतंय! अदानींच्या भेटीनंतर राज ठाकरे तातडीने फडणवीसांच्या भेटीला

संतोष कानडे

मुंबईः देशाच्या उद्योग क्षेत्रातलं सर्वात मोठं नाव असलेले गौतम अदानी यांनी आज राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जात त्यांची भेट घेतली. त्यानंतर राज ठाकरे तातडीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले आहेत.

यापूर्वी गौतम आदानी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे तसेच भाजपचे नेते आशिष शेलार यांची भेट घेतली होती, त्यानंतर त्यांनी आज राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. अदानी हे मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थावर पोहचले. उद्योगपती गौतम अदानी आणि राज ठाकरे यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चांना उधाण आले आहे.

हेही वाचाः योग्य वेळेतच करा इच्छापत्र आणि व्हा चिंतामुक्त

या भेटीनंतर राज ठाकरे सहकुटुंब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले आहेत. ठाकरे-फडणवीस यांच्या डिनर डिप्लोमसीची राज्यभर चर्चा आहे. पडद्यामागे काहीतरी शिजत असल्याचं राजकीय जाणकार सांगत आहेत. राज ठाकरे यांनी यापूर्वीही गुप्तपणे देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. आजही ते अचानकपणे फडणवीसांच्या भेटीला पोहोचले.

अदानी-राज ठाकरे यांच्या भेटीबद्दल सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अदानी हे सध्या सर्वच राजकीय क्षेत्रातील नेत्यांची भेट घेत आहेत. यापूर्वी त्यांनी एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती.धारावी डेव्हलपमेंटचा मुंबईमधील मोठा प्रोजेक्ट अदानी यांच्या कंपनीला मिळाला आहे. या संदर्भात येणाऱ्या अडचणींवर अदानी हे राज्यातील नेत्यांच्या भेटी घेत आहेत असे सांगितले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT