तात्या लांडगे
सोलापूर : सासरच्या छळामुळे व्यवसायातून मिळणारे उत्पन्न बंद झाल्याचा दावा करत डॉ. शोनाली वळसंगकर यांनी पती, सासू, नणंद आणि त्यांच्या पतीविरोधात महिलांचे कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण अधिनियमांतर्गत अर्ज दाखल केला आहे. त्यात दरमहा २८ लाख रुपयांच्या अंतरिम निर्वाहभत्त्यासह बदनामी, मानसिक छळ, गोपनीयतेचा भंग आणि अल्पवयीन मुलीच्या मानसिक हानीबद्दल एकूण २२ कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी करण्यात आली आहे. या अर्जावर सोमवारी (ता. २०) सुनावणी होण्याची शक्यता आहे. प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येनंतर वळसंगकर कुटुंबातील अंतर्गत कलह विकोपाला गेला आहे. कलह आधी पोलिस ठाण्यात आणि आता न्यायालयात पोहोचला आहे.
५० टक्के भागीदारी; तरीही बेदखल ?
डॉ. शोनाली यांनी १५ जुलै २००५ रोजी विवाह झाल्यापासूनच्या प्रत्येक घटनेची नोंद अर्जात नमूद केली आहे. २०१६ ते २०१८ पर्यंत एसपी इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसायन्सेसमध्ये पूर्णवेळ सर्जन म्हणून काम केले. २०१८ मध्ये सासरे डॉ. शिरीष यांनी २० टक्के भागीदार केले व उत्पन्नातील १० टक्के नफा देण्याचेही ठरले. १ एप्रिल २०२२ रोजी सासऱ्यांनी स्वेच्छेने ५० टक्के भागिदारी दिली. सून व मुलाने सर्व कारभार पाहावा अशी त्यांची इच्छा होती. पण, त्यांच्या मृत्यूनंतर सासरच्यांनी कागदोपत्री अफरातफर करून मला बेदखल केले. त्यानंतर २० जानेवारी २०२६ रोजी निवासस्थानातून बाहेर काढले आणि त्यांनी सतत छळ केल्याचेही अर्जात नमूद आहे.
डॉ. शोनाली यांच्या प्रमुख मागण्या
ज्या इमारतीसाठी मी माझ्या हिश्शातील कोट्यवधी रुपये खर्च केले, त्याठिकाणी राहण्यास सासरचे मज्जाव करीत आहेत. त्यांनी निवासाच्या हक्कात अडथळा करू नये. त्यांच्या सतत त्रासामुळे मला संरक्षणाची आवश्यकता आहे.
रुग्णालयात पूर्वीप्रमाणे कामकाज करण्यास परवानगी मिळावी व कामकाजावेळी सासरच्यांनी कोणताही अडथळा करू नये. रुग्णालयातील सामाईक घरातील खोलीत लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे काढण्याचे आदेश द्यावेत.
मुलीचे शिक्षण, आरोग्यासह इतर खर्चासाठी दरमहा तीन लाख रुपये मिळावेत. बदनामीमुळे, सासरच्या त्रासामुळे माझे व्यवसायातून मिळणारे उत्पन्न बंद झाले. माझे उत्पन्न पुन्हा सुरू होईपर्यंत दरमहा २५ लाख रुपये मिळावेत.
डॉ. उमा यांच्या प्रकरणाची २४ जुलैला सुनावणी
मृत डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या पत्नी डॉ. उमा वळसंगकर यांनी सून, सूनेचे आई-वडील यांच्याविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. रुग्णालयातील तिसऱ्या मजल्यावरील घरात सून डॉ. शोनाली जबरदस्तीने घुसली असून ती खूप मानसिक त्रास देत आहे. त्यांना त्या खासगी प्रॉपर्टीत येण्यास मनाई किंवा प्रतिबंध करावा, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. यावर डॉ. शोनालींच्या वकिलांनी म्हणणे मांडायला वेळ मागितला असून त्यावर २४ जुलैला सुनावणी होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.