महाराष्ट्र बातम्या

रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याची आवश्‍यकता ! 

डॉ. अनिल काकोडकर (ज्येष्ठ शास्त्रज्ञ)

लॉकडाऊनमुळे आपण सगळेच घरात आहोत. काहीजण "वर्क फ्रॉम होम' करत आहेत तर तर काहीजण कुटुंबासोबत वेळ घालवत आहेत. मुंबई-पुण्यासारख्या ठिकाणी घर ते ऑफिस या प्रवासातच दोन-तीन तास जातात. आता तो वेळ तरी प्रत्येकाचा वाचतोय. तो मिळालेला वेळ आपण कसे सत्कारणी लावतो हे फार महत्त्वाचे आहे. परिस्थिती कठीण आहे हे खरं असलं तरी तिच्याकडे सकारात्मकपणे बघणे आणि आपला वेळ चांगल्या गोष्टींमध्ये घालवणे, आपल्या हातात तर इतकेच आहे. 

"वर्क फ्रॉम होम' ही कल्पना तशी नवीन नाही, पण त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर सुरू झाला आहे. कामाच्या बाबतीतले हे संक्रमण चालू आहे त्याचा जगावर काय परिणाम होईल हे बघणे आवश्‍यक आहे. पूर्वीच्या काळात कॉलेज संपले की माणूस जॉबला लागायचा, पुढे त्याच्या शिक्षणाचा फार उपयोग होताना दिसत नसे. पण आता काळ बदलतो आहे. तंत्रज्ञान खूप बदलते आहे, आपल्याला आयुष्यात नव्याने काही गोष्टी शिकणे आवश्‍यक आहे. शिक्षण हे जन्मभर सुरूच राहणार आहे. कोरोना संपल्यानंतर या गोष्टीची फार जाणीव होईल. अनेकजण आयुष्य एकाच पद्धतीने जगत आले असतील, पण त्यांना आता बदलावे लागेल. सर्वांकडे आता चांगला मोबाईल आहेच, अनेकांकडे कॉम्प्युटर आहे. आपण त्याचा या काळात अधिकाधिक वापर केला पाहिजे. नवनवीन गोष्टी शिकण्यात हा वेळ घालवला पाहिजे. हा लॉकडाऊन म्हणजे आपल्याला मिळालेला "ब्रेक' आहे, झपाट्याने बदलणाऱ्या या जगाशी जुळवून घेण्यासाठी. आपल्या मनात राहिलेल्या काही सुप्त इच्छा असतात, गाणं किंवा एखादं वाद्य शिकणे, फार माहिती नसलेल्या पण आवड असलेल्या एखाद्या विषयाचे ज्ञान घेणे अशा अनेक विषयांसाठी आता हा वेळ देऊ शकतो. 

आपल्या देशाचा विचार केला तर या कोरोनाचा आपल्या अर्थकारणावर फार परिणाम होतोय. पण आता त्याच्या मूळ समस्येकडे लक्ष देणे आवश्‍यक आहे. आता आपल्या लक्षात आले आहे की कामासाठी म्हणून अनेक गावातली बहुतांश लोकं शहरात येऊन कामं करत आहेत. शहरांवरचा भार वाढतोय आणि गावं ओस पडत चालली आहेत. त्यामुळे गावात जास्तीतजास्त रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याची आवश्‍यकता आहे. गाव भाग आणि शहरी भाग यात समतोल होण्याची गरज आहे. या नवीन ज्ञानयुगामध्ये "वर्क फ्रॉम होम'च्या धरतीवर "वर्क फ्रॉम व्हिलेज' का नाही होऊ शकत? योग्य नियोजन केले तर हे घडणे शक्‍य आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

माझ्या माहितीत असे अनेक तरुण आहेत जे मुंबईत बसून तंत्रज्ञानाचा वापर करून अमेरिकेतील कामे करतात, मग याच धर्तीवर गावातील लोकही करू शकतात. मी सध्या यावर काम करतोय. "विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने गावांचा विकास' अशा एका मोठ्या प्रकल्पाचा अभ्यास करतोय. यामुळे शहर आणि गाव यातील आर्थिक-सामाजिक दरी कमी होईल व स्थलांतराचे प्रमाण थांबेल. देव न करो पण कधी पुन्हा असे काही संकट आले तर ते यामुळे हाताळणे पण सोपे जाईल. लॉकडाऊनमध्ये माझा जास्तीच जास्त वेळ कॉम्प्युटरवरच जातोय. वाचन, लिखाण आणि नवीन काही गोष्टींचा अभ्यास हे सर्व कॉम्प्युटरवरच सुरू आहे. गावांच्या विकासाच्या प्रकल्पाच्या अभ्यासात वेळ जातोय, एकप्रकारे माझेही "वर्क फ्रॉम होम' सुरू आहे ! 

(शब्दांकन - अंकित काणे) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

SCROLL FOR NEXT