Ravi Rana Esakal
महाराष्ट्र बातम्या

Ravi Rana: बच्चू कडू यांच्या मेळाव्यानंतर रवी राणा यांची प्रतिक्रिया म्हणाले, आता आम्ही...

आम्ही लोकांसाठी काम करत राहणार बच्चू कडू आणि माझ्यातला वाद आता संपला

सकाळ डिजिटल टीम

आमदार रवी राणा आणि आमदार बच्चू कडू यांच्यातील वादानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी केल्यानंतर वादावर पडदा टाकला आहे. मुंबईत झालेल्या बैठकीनंतर आमदार रवी राणा यांनी दिलगीरी व्यक्त केली. त्यानंतर बच्चू कडू यांनी सोमवारी रात्री कार्यकर्त्यांच्या बैठकी घेतल्या आणि आपली भूमिका जाहीर करण्यासाठी आज अमरावती येथे मेळाव्याचे आयोजन केले होते. त्यावेळी दोघांकडून हा वाद संपला असल्याचं कडू आणि राणा यांनी व्यक्त केलं आहे. त्यानंतर आता रवी राणा यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.

आमदार रवी राणा पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, आता शेतकरी, सर्वसामान्य यांचे प्रश्न, बेरोजगारी संबधी प्रश्न ते पुढे आणायचे आहेत म्हणून आता हा वाद विवाद राहिला नाही संपला आहे. आता कोणताही वाद नाही आम्ही लोकांसाठी काम करत राहणार बच्चू कडू आणि माझ्यातला वाद आता संपला आहे अशी प्रतिक्रिया रवी राणा यांनी दिली आहे.

त्याचबरोबर आज आज अमरावतीत आमदार बच्चू कडू यांच्या उपस्थितीत प्रहार संघटनेचा मेळावा होत आहे. आमदार रवी राणा यांच्यासोबत झालेल्या वादासंदर्भात बच्चू कडू यांनी आज आपली भुमिका मांडली. कडू नेमका काय निर्णय घेणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं होतं. मेळावा सुरू झाल्यानंतर बोलताना बच्चू कडू म्हणाले की सत्ता चुलीत गेली. प्रहार काही अंडु पांडू नाही. वार करण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे. आमच्या वाटेला आले तर कोथळा काढल्याशिवाय राहत नाही. 350 गुन्हे घेऊन अंगावर घेऊन फिरतोय असं म्हणत त्यांनी रवी राणा यांच्यावर टीका केली आहे.

ही पहिली वेळ आहे म्हणून माफ करतो. पुढच्या वेळी माफी मिळणार नाही. पुन्हा आमच्या वाटेला गेल्यास माफी मिळणार नाही. आम्ही विचारांचा झेंडा हाती घेतला आहे. आम्ही कोणाच्या वाट्याला जात नाही आणि आमच्या वाट्याला गेलं तर आम्ही सोडत नाही. मी राजकारणासाठी कोणाचा वापर केला नाही. जली को आग कहते है, बुझी को राख कहते हैं, और जिस बारूद जो निकलता है उसे प्रहार कहते है, असंही कडू म्हणालेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra NCC Crisis: राज्य सरकारच्या लालफीतशाहीमुळे एनसीसी विस्ताराला ब्रेक; दीड लाख छात्रांसाठी स्वतंत्र प्रशिक्षण अकादमीचा अभाव, ४०-६० टक्के पदे रिक्त

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलावली तातडीची बैठक...

Mulshi Aadhaar: आधार अपडेटअभावी मुळशीतील १,२४६ विद्यार्थी अडचणीत; ३० सप्टेंबरच्या डेडलाइनने प्रशासनाची परीक्षा

Kannad Ambadi Dam Water Crisis: अंबाडी धरणातील पाणीसाठा फक्त ८.९१ टक्के; जानेवारीनंतर कन्नड शहर व परिसरात तीव्र पाणीटंचाईची शक्यता

Leopard Attack Nirgudsar: निरगुडसरमध्ये बिबट्याचा हल्ला; ब्रिडिंगसाठी आणलेला ६० हजारांचा बोकड व मेंढी ठार

SCROLL FOR NEXT