RAF
RAF Sakal
महाराष्ट्र

राज ठाकरेंच्या धमकीनंतर अफझलखानच्या कबर परिसरात मोठा बंदोबस्त

सकाळ डिजिटल टीम

सातारा : औरंगाबादमधील औरंगजेबाच्या कबरीवरून सुरू झालेल्या वाद आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्या धमकीनंतर सातारा जिल्ह्यातील अफझलखानच्या कबरीभोवतालची सुरक्षा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे. या ठिकाणी सुरक्षेच्या कारणास्तव रॅपिड अॅक्शन फोर्सचे (RAF) जवान तैनात करण्यात आले आहे. (After MNS Threat Security Tightens Around Afzal Khan's Grave)

अफझलखानाच्या कबरीवर काय वाद आहे?

अफझलखानाची कबर महाबळेश्वरजवळ प्रतापगडाच्या पायथ्याशी आहे. AIMIM नेते असदुद्दीन ओवैसी यांनी नुकतेच खुलदाबाद येथील मुघल सम्राट औरंगजेब यांच्या समाधीला भेट देत श्रद्धांजली अर्पण केली होती. त्यानंतर या वादाला तोंड फुटले आहे. ओवैसी यांच्या या कृत्यानंतर मनसेकडून याचा निषेध करण्यात आला. तसेच या कृतीप्रकरणी राज्य सरकारला ओवैसी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली असून, जर सरकारने त्यांच्यावर कारवाई केली नाही तर, मनसेकडूनयावर योग्य ते पाउल उचलेले जाईल.

राज ठाकरेंचा इशारा नेमका काय?

नुकतीच रविवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा पार पडली. यामध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या अफझलखानाचा वध केला. त्याच्या समाधी स्थळावर विशिष्ट समाजातील लोकांकडून पुष्पहार अर्पण केले जात आहे. असे असताना महाराष्ट्र सरकार याकडे केवळ बघ्याची भूमिका घेत असून, यावर राज्य सरकारकडून योग्य ते पाउलं उचलण्यात न आल्यास मनसेकडून योग्य ती कारावाई केली जाईल असा इशारा राज यांनी दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : भारतातील निवडणूक प्रक्रिया पाहण्यासाठी आले 23 देशांमधील पाहुणे

ISL vs IPL : पीसीबी घेणार मोठा पंगा; आयपीएल अन् पीएसएलमध्ये होणार टक्कर

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : ऋतुराजने पुन्हा नाणेफेक गमावली; पंजाबने घेतला गोलंदाजीचा निर्णय

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

SCROLL FOR NEXT