Dhananjay Munde Esakal
महाराष्ट्र बातम्या

Dhananjay Munde : पंकजा मुंडेंपाठोपाठ उपमुख्यमंत्रीही धनंजय मुंडे यांच्या भेटीला

परळी येथे धनंजय मुंडे यांचा अपघात झाला होता

सकाळ डिजिटल टीम

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या कारला परळीमध्ये मंगळवारी 3 जानेवारी 2023 रोजी रात्री अपघात झाला आहे. यामध्ये मुंडे यांच्या छातीला आणि डोक्याला मार लागला. या अपघातात मुंडेंच्या कारचंही मोठे नुकसान झाले. त्यांच्या या अपघातानंतर राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक नेत्यानी धनंजय मुंडे यांची भेट घेतली. आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडे यांच्या भेटीला गेले आहेत.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडे यांना भेटून त्यांच्या तब्येतीची विचारपुस केली आहे. या कारणामुळे फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि पंकजा मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांची भेट घेतली.

बहिणीने भावाची भेट घेतल्यामुळे आणि त्यांचे राजकीय मतभेद जग जाहीर असताना भेटीचे फोटो समोर आले होते. पंकजा मुंडे आणि धनजंय मुंडे यांच्यात असलेले राजकीय वैर सर्वानाच माहिती आहे. अनेकदा ते सार्वजनिक मंचावरुन एकमेकांवर टीका करतात. पण, गरजेवेळी ते नेहमी एकमेकांच्या पाठीशीही उभे असल्याचे अनेकदा पाहायला मिळाले आहे. यावेळीही राजकीय वैर विसरुन पंकजा मुंडे यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात बंधू धनंजय मुंडे यांची भेट घेतली होती. तर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीची चौकशी करताना दिसून आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrapur Accident: भाविकांचे वाहन उलटले, एक ठार, सतरा जखमी; भटाळा येथे गेले होते दर्शनासाठी

Latest Marathi News Update: काँग्रेस भवनात दगडफेक प्रकरणी १०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हा

Pune News: रेल्वे चालकाला सात किलोमीटर आधीच दिसणार सिग्नल; प्रवाशांना सुरक्षेचे ‘कवच ४.०’, २५० किमीवर यशस्वी चाचणी!

Rohit Sharma चे खिलाडूवृत्तीचं ज्ञान पाजळणाऱ्या पाकिस्तानला कृतीतून उत्तर! IND vs PAK मॅचआधी वसीम अक्रमशी गळाभेट; Video Viral

Nagpur Crime : भाजप नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक हल्ला; गंभीर जखमी, संतप्त कार्यकर्त्यांची रुग्णालयासमोर गर्दी

SCROLL FOR NEXT