After Shiv Sena symbol frozen commission Uddhav Thackeray sent picture new symbol colleagues sakal
महाराष्ट्र बातम्या

Shiv Sena symbol frozen by EC : उद्धव यांनी सहकाऱ्यांना पाठवले चिन्ह?

वाघ, ढाल-तलवार किंवा गदाबाबत विचार

मृणालिनी नानिवडेकर /सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई : शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह आयोग गोठवल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनातील नव्या चिन्हाचे चित्र पक्षातील सहकाऱ्यांना पाठवल्याचे समजते. निवडणूक आयोगाचा आदेश येताच उद्धव ठाकरे यांनी काही सहकाऱ्यांना दूरध्वनी केले. या लढाईसाठी आपण तयार असल्याचे संकेत त्यांनी दिले.

ठाकरे गटाला अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी तयार करणे हा या दूरध्वनीमागचा उद्देश असावा, असे एका नेत्याने नमूद केले. आजच्या आदेशानुसार शिवसेना हे नाव वापरता येणार नसले तरी शिवसेना ठाकरे गट हे नाव वापरण्यास मिळेल, अशी शक्यता दिसत आहे. त्याबाबत उद्याच्या बैठकीत विचार केला जाण्याची शक्यता आहे. वाघ, ढाल-तलवार किंवा गदा या चिन्हाचा शिवसेना ठाकरे गट विचार करत असला तरी शस्त्राची आता चिन्ह म्हणून निवड करता येत नाही, असे सांगितले जात आहे. दोन्ही गटांना चिन्हासाठी तीन पर्याय देता येणार आहे.

अंधेरीची तयारी

या निर्णयाचा प्रभाव अंधेरी पोटनिवडणुकीवर होणार आहे..शिंदे गट या निवडणुकीत उमेदवार उतरवणार नाही असे दिसत आहे. त्यामुळे भाजप या निर्णयाचा विचार कसा करणार ते महत्त्वाचे आहे. रामभाऊ म्हाळगी उत्तन येथे सुरु असलेल्या भाजपच्या बैठकीत अंधेरी पोटनिवडणुकीबाबत चर्चा होणार आहे. भागात कॉंग्रेसला मानणारा मोठा वर्ग असून ती मते शिवसेनेच्या ठाकरे गटाला मिळाली तर ही निवडणूक ते जिंकू शकतील. भाजपसाठी ही पोटनिवडणूक जिंकणे आवश्यक असल्याने जिंकण्याची रचना आखली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT