Special Railway
Special Railway Sakal
महाराष्ट्र

अपघातानंतर मदत न मिळाल्याने अनेकांचा मृत्यू! जखमींना मदत करा, पोलिस चौकशीला नाहीत बोलावणार

तात्या लांडगे

अपघातग्रस्तांना मदत करा, चौकशी होणार नाही

अपघातानंतर अनेकदा लोक पोलिस चौकशीला घाबरून जखमींना मदत करीत नाहीत. स्वत:कडे वाहन असतानाही जखमींना उपचारासाठी रुग्णालयात नेत नाहीत. अपघाताचा व्हिडिओ काढणारे अनेकजण त्याच मोबाईलवरून संबंधित यंत्रणेला कळवत सुद्धा नाहीत. पण, अपघातानंतर ३०-४० मिनिटात जखमीवर उपचार झाल्यास त्याचा जीव वाचू शकतो. त्यामुळे सर्वानीच मदतीची भूमिका ठेवावी. मदत करणाऱ्या त्या व्यक्तीला पोलिस चौकशीला बोलवत नाहीत. तसे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत. उलट त्या व्यक्तींना शासनाकडून ‘जीवनदूत’ म्हणून पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते.

सोलापूर : राज्यात दरवर्षी सरासरी १३ हजारांहून अधिक लोक रस्ते अपघातात जीव गमावतात. धक्कादायक बाब म्हणजे त्यात १६ वयोगटासह ४५ वर्षांपर्यंतच्या तरूणांची संख्या सर्वाधिक आहे. मागील सव्वादोन वर्षांत त्या वयोगटातील जवळपास १२ हजार जणांचा मृत्यू रस्ते अपघातात झाला आहे. त्यात विनापरवाना वाहन चालविणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. मार्चमधील ‘आरटीओ’च्या कारवाईत तब्बल ९०७ जण विनापरवाना वाहन चालवत असल्याचे आढळून आले.

सोलापूर जिल्ह्यात वाहनांची एकूण संख्या सद्य:स्थितीत १९ लाखांहून अधिक आहे. प्रत्येक घरात दोन वाहने, अशी स्थिती आहे. दहावी-बारावीत शिक्षण घेणाऱ्या मुला-मुलींच्या हाती पालक बिनधास्तपणे वाहने देत असल्याची वस्तुस्थिती आहे. हेल्मेट न घालता दुचाकी चालविणाऱ्याला एक हजार रुपयांचा दंड आहे.

तरीपण, बहुतेक दुचाकीस्वार घराबाहेर पडताना हेल्मेट घालत नाहीत. दुसरीकडे चालकासह मागील सीटवर बसलेल्यांना आता सीटबेल्ट बंधनकारक असतानाही अतिवेगाने धावणाऱ्या चारचाकीतील कोणीच सीटबेल्ट घातल्याचे दिसत नाही. अनेक ऑटोरिक्षांसह खासगी प्रवासी वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसलेले असतात. अशी भयानक परिस्थिती असतानाही वाहतूक पोलिस ठरावीक विशेषत: जड वाहनांनाच टार्गेट करतात.

त्यात पुन्हा परजिल्ह्यातील किंवा परराज्यातील वाहनांची अडवणूक होते, अशीही स्थिती आहे. दुसरीकडे वाहन चालक देखील स्वत:हून वाहतूक नियम पाळत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. रस्त्यांचा अंदाज नसतो, वाहनांच्या वर्दळीत वाहन चालविण्याचा अनुभव नसतो, परवाना सुद्धा नसतो, तसे लोक अपघाताचे बळी ठरतात. अशावेळी आई-वडिलांचा हाताखाली आलेला आधार, नवविवाहितेचा पती, चिमुकल्यांचे बाबा जग सोडून जातो आणि कुटुंबाची वाताहात होते.

कुटुंबातील कोणीतरी तुमची वाट पाहतयं...

अल्पवयीन मुलाच्या हाती वाहन आढळल्यास संबंधित वाहन मालकासह त्या मुलाच्या पालकावर गुन्हा दाखल होऊ शकतो. विनापरवाना वाहन चालविणाऱ्याला दहा रुपये तर विनाहेल्मेट दुचाकीस्वाराला एक हजाराचा दंड होतो. पोलिस कारवाई करीत नाहीत म्हणून नियम मोडायचे हा विचार सोडून प्रत्येकांनी स्वत:च्या जीवाबरोबरच कुटुंबाचा विचार केल्यास निश्चित अपघात कमी होतील.

- अमरसिंह गव्हारे, सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics: विधानसभेपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होणार? बंडखोर ठाकरे-पवारांकडे परतणार?

Election Commission : ''सिस्टीममध्ये कुठलीही चूक होऊ शकत नाही'', मतमोजणीच्या तयारीबद्दल मुख्य आयुक्त राजीव कुमार म्हणाले...

Priyanka Chopra Beauty Tips: चमकदार त्वचेसाठी देसी गर्लने शेअर केली बॉडी स्क्रब बनवण्याची सोपी पद्धत

Bengluru Viral Video : बंगळुरूमध्ये कोकोनट अटॅकरची दहशत ; भरदिवसा गाडी फोडली, व्हायरल होतोय व्हिडीओ

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीचा कळंबा कारागृहात खून; नेमकं काय घडलं? मृतदेह स्वीकारण्यास पत्नीचा का नकार?

SCROLL FOR NEXT