Ashadhi Wari  sakal
महाराष्ट्र बातम्या

Ashadhi Wari : अल्हाददायक वातावरणात रंगले उभे रिंगण;वैकुंठनायकाच्या ओढीने निघालेला सोहळा बोरगावात

आल्हाददायक वातावरणात सकाळी रंगलेल्या रिंगणानंतर संत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याने साखर टप्प्यातून वाटचाल करीत बोरगाव मुक्काम गाठला. हरिनामाचा जयघोष करीत निघालेला सोहळा पंढरी समीप आल्याने वारकऱ्यांच्या पावलांना वेग आला आहे.

राजेंद्रकृष्ण कापसे : सकाळ वृत्तसेवा

बोरगाव : आल्हाददायक वातावरणात सकाळी रंगलेल्या रिंगणानंतर संत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याने साखर टप्प्यातून वाटचाल करीत बोरगाव मुक्काम गाठला. हरिनामाचा जयघोष करीत निघालेला सोहळा पंढरी समीप आल्याने वारकऱ्यांच्या पावलांना वेग आला आहे.

देवाचा भक्त तो देवासी गोड ।

आणिकांसी चाड नाही त्याची ।।

कवणाचा सोईरा नव्हे कहा सांगाती ।

अवघीयां हातीं अंतरला ।।

सकाळी पादुकांना अभिषेक करून अकलूजकरांचा निरोप सोहळा मार्गस्थ झाला. आल्हाददायक वातावरणात वारकरी पावलं वेगाने टाकत वाटचाल सुरू होती. सकाळी सकाळी काकड्याच्या अभंगातून विठुरायाचे गोडवे गात सोहळा वारकरी चालत होते. पालखी नऊ वाजण्याच्या सुमारास माळीनगरच्या रिंगणाच्या टप्प्यावर पोचली. रिंगण असल्याने वारकऱ्यांच्या उत्साहाला उधाण आले होते. रथ रिंगणासाठी थांबला. संस्थानचे सर्व आजी- माजी अध्यक्ष, सोहळा प्रमुख व विश्वस्त यांच्या सूचनेनुसार चोपदार नामदेव गिराम देशमुख चोपदार, कानसूरकर चोपदार यांनी उभे रिंगण लावण्यास सुरवात केली.

टाळ-मृदंगाचा गजर आणि ‘ज्ञानोबा तुकाराम’ चा जयघोष सुरू होता. रस्त्यावर दिंड्यांच्या मध्यभागी रिंगण करण्यात आले. मधून दोन्ही बाजूला वारकरी झाले. देवाचा व स्वाराचा असे दोन्ही अश्व नगरखान्यापासून मागे पालखी रथाजवळ पोचला. तेथे श्रीतुकोबारायांचे दर्शन घेतले. मागील काही दिंड्यापर्यंत अश्व पोचले. अश्व पुन्हा रथाजवळ आले. त्यांना संस्थानच्या वतीने हार घातले. त्यांचा खुराक देण्यात आला. अश्व पुन्हा नगरखान्याजवळ पोचले. त्यानंतर आरती झाली. सोहळा मार्गस्थ झाला. माळीनगरच्या साखर कारखान्याच्या मैदानावर जेवणासाठी विसावला. येथे मान्यवरांच्या हस्ते अभिषेक आणि आरती झाली.

बारा वाजता सोहळा मार्गस्थ झाला. ऊन आणि ढगाळ वातावरण उसाच्या शेतात, केळीच्या बागेत वारकरी बसले होते. इनामके वस्ती म्हाळुंगे परिसरात रस्ता अरुंद आहे. वाहतूक कोंडी झाली होती. काही वेळ पावसाची हलकी सरी पडल्या. बोरगावला सोहळा सात वाजता पालखी पोचली. समाजआरती नंतर सोहळा विसावला. रात्री माई दिंडीचे कीर्तन झाले तर जागर म्हातारबुवा पात्रुडकर दिंडीच्या वतीने जागर झाला.

तोंडले-बोंडलेजवळ धावा

संत तुकाराम महाराज सोहळ्यातील धावा उद्या तोंडले- बोंडले येथे मानाचा अभंग म्हणत धावा होणार आहे. असे सोहळ्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT