Chandrakant Patil  esakal
महाराष्ट्र बातम्या

Chandrakant Patil: शाईफेकीच्या घटनेवर राष्ट्रवादीची पहिली प्रतिक्रिया

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अंगावर शाई फेकण्याचा प्रकार

रुपेश नामदास

Chandrakant Patil: चिंचवड येथील मोरया गोसावी संजीवन समाधी सोहळ्याच्या उद्घाटनासाठी आलेल्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अंगावर शाई फेकण्याचा प्रकार शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडला. पाटील यांनी सोमवारी पैठण येथे एका कार्यक्रमात बोलताना कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले होते.

या पार्श्वभूमीवर संपुर्ण महाराष्ट्रातून संताप व्यक्त होत आहे. चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकझाल्यानंतर विविध स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. त्या घटनेवर राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रीया दिली आहे.

ते म्हणाले की, "शाईफेक करणारे कार्यकर्ते कोणाचे होते याची मला कल्पना नाही, मात्र ते फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचाराचे असतील, मागच्या काही दिवसांपासून महापुरूषांबाबत मंत्री वादग्रस्त विधाने करत आहेत, देवेंद्र फडणवीस यांनी या सर्वांना सांगितलं पाहिजे महापुरूषांबद्दल बोलताना शब्द विचार करून वापरावे, सातत्याने अशी वादग्रस्त विधाने केली जात आहेत"

"त्यामुळे राज्यातील वातावरण गरम आहे, तर त्यांनी कार्यकर्त्यांना आव्हान केलं की चंद्रकांत पाटलांनी केलेल्या विधानाची दिलगिरी व्यक्त केली आहे यावर थांबलं पाहिजे मात्र ज्यांना आंदोलने करायची आहेत त्यांनी लोकशाहीच्या मार्गाने करावीत, कोणालाही इजा होईल अशा प्रकारे आंदोलने करू नये" अस मत भुजबळ यांनी व्यक्त केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Update: वादळी पावसाचा इशारा कायम; राज्यात यलो अलर्टचा इशारा, हवामान विभागानं नेमकं काय सांगितलं?

Women's World Cup 2025: आता रंगणार सेमीफायनलचा थरार! कोण कोणाला भिडणार? कुठे अन् कधी पाहाणार सामने, वाचा एका क्लिकवर

छोट्या करदात्यांना व्याजमाफीचा दिलासा

DMart Sale : डीमार्टमध्ये 'या' तारखेपासून सगळ्यात स्वस्त वस्तूंचा सेल सुरू होणार; खरेदीला जाण्यापूर्वी सिक्रेट ऑफर्स, पहा एका क्लिकवर

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 27 ऑक्टोबर 2025

SCROLL FOR NEXT