Sharad Pawar Esakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar: राष्ट्रवादीत मोठा ट्विस्ट! अजित पवार गटातील नेत्यानंतर जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड विरोधकांची बैठक सोडून वायबी सेंटरकडे रवाना

अजित पवार गटातील मंत्री शरद पवार यांच्या भेटीला, अधिवेशनापूर्वीच मोठी घडामोड

अंकिता खाणे (Ankita Khane)

राष्ट्रवादीतील फुटीला 15 झाले आहेत अशातच आज घडामोडींना मोठा वेग आला आहे. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे सर्व मंत्री राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीला गेले आहेत. अधिवेशनाच्या एक दिवस आधीच राष्ट्रवाचे सर्व मंत्री शरद पवार यांच्या भेटीला गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत तर नेत्यांच्या भुवया देखील उंचावल्या आहेत. या भेटीत काय चर्चा होते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.(Latest Marathi News)

उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, खासदार सुनील तटकरे, राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, आदिती तटकरे, धनंजय मुंडे, अनिल पाटील, धर्मराव बाबा आत्राम, संजय बनसोडे, नरहरी झिरवळ यांच्यासह सर्वच नेते शरद पवार यांना भेटायला वायबी सेंटरमध्ये दाखल झाले आहेत.(Latest Marathi News)

दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे देखील चव्हाण सेंटरकडे निघाले आहेत. तर 'चव्हाण सेंटरला कोण आलंय हे माहीत नाही. मला सुप्रिया सुळे यांचा फोन होता. त्यामुळे मी वायबी चव्हाण सेंटरकडे जात आहे, बाकी मला काही माहीत नाही', असं जयंत पाटील म्हणाले आहेत. मात्र, त्यांनी या भेटीवर अधिक भाष्य केलं नाही. तसेच राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड चव्हाण सेंटरमध्ये आले आहेत. (Marathi Tajya Batmya)

शरद पवार हे मंत्रालयासमोरीलच यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आहेत. तिथेच हे मंत्री पवारांना भेटायला गेले आहेत. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पहिल्यांदाच हे मंत्री शरद पवार यांनी भेटायला गेले आहे. अशातच उद्या राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यापूर्वीच हे नेते शरद पवार यांना भेटायला गेले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचे मंत्री आणि शरद पवार यांच्यामध्ये काय चर्चा होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.(Latest Marathi News)

या मंत्र्यांसोबत अजित पवारही आहेत. अजितदादा दुसऱ्यांदा शरद पवार यांच्या भेटीला आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. अजित पवार हे परवाच शरद पवार यांच्या घरी गेले होते. त्यांची काकू प्रतिभा पवार या आजारी असल्याने त्यांना भेटण्यासाठी अजित पवार गेले होते. अजितदादानंतर आता राष्ट्रवादीचे मंत्रीही शरद पवार यांना भेटायला गेल्यामूळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT